लाडकी बहीण योजनेचा अर्ज 'Rejected' झालाय की 'In Review' आहे? रखडलेले पैसे मिळवण्यासाठी करा 'हे' काम!
Ladki bahin yojana fix rejected application check ekyc status : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, मात्र तांत्रिक कारणांमुळे काहींचे अर्ज अद्याप प्रलंबित (In Review) आहेत किंवा बाद (Rejected) झाले आहेत. तुमचाही अर्ज असाच अडकला असेल, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. नारीशक्ती दूत ॲपवर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता आणि रखडलेले हप्ते मिळवू शकता.

अर्ज 'In Review' किंवा 'Rejected' असल्यास काय करावे?
१. 'In Review' स्टेटस असल्यास:
जर तुमचा अर्ज बराच काळ 'In Review' दिसत असेल, तर याचा अर्थ तुमची कागदपत्रे पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत. १५ दिवसांपेक्षा जास्त काळ हेच स्टेटस असल्यास जवळच्या सेतू केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्जाचा फॉलो-अप घ्यावा.
२. 'Rejected' (अर्ज बाद) होण्याची कारणे
अस्पष्ट फोटो, चुकीचे नाव, बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा उत्पन्नाची चुकीची माहिती या कारणांमुळे अर्ज नाकारले जातात.
३. अर्ज दुरुस्त करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत.
- नारीशक्ती दूत ॲप: प्रथम तुमच्या मोबाईलमधील ॲपमध्ये लॉग इन करा.
- 'Edit' पर्याय: नाकारलेल्या अर्जासमोर असलेल्या 'दुरुस्त करा' (Edit) बटणावर क्लिक करा.
- कारण वाचा: अर्ज का नाकारला आहे, याचे कारण नीट वाचा आणि त्यानुसार बदल करा.
- अपडेट करा: नवीन आणि स्पष्ट कागदपत्रे अपलोड करून 'Update/Submit' करा. तुमचा अर्ज पुन्हा रिव्ह्यूमध्ये जाईल.
तुमची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण आहे का? अशी तपासा स्टेटस
ई-केवायसी अपूर्ण असल्यास अर्ज मंजूर असूनही पैसे जमा होत नाहीत. ती तपासण्यासाठी खालील ३ मार्ग आहेत.
- १. नारीशक्ती दूत ॲप: 'Applied Applications' मध्ये जाऊन अर्जाच्या नावापुढे 'e-KYC Completed' किंवा 'Verified' लिहिले आहे का ते तपासा.
- २. आधार वेबसाइट (UIDAI): आधारच्या वेबसाइटवर 'Bank Seeding Status' तपासा. तुमचे बँक खाते आधारशी 'Active' जोडलेले असणे अनिवार्य आहे.
- ३. बँकेत जाऊन खात्री करा: तुमच्या बँकेत जाऊन खाते 'NPCI Mapping' किंवा 'DBT' (थेट लाभ हस्तांतरण) साठी सक्रिय आहे का, याची चौकशी करा.
(महत्त्वाची टीप: तुमचे खाते 'Active' असणे आणि त्याला आधार लिंक असणे ही पैसे मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट आहे.)
हेही वाचा : लाडक्या बहिणींचे जानेवारी अन् फेब्रुवारीचे प्रलंबित हप्ते 'या' तारखेला जमा होणार; 3 हजार रुपये येणार
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेचे पैसे अडकले तर 'हे' काम करा! योजनेतील त्रुटी सुधारण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय












Click it and Unblock the Notifications