लाडकी बहिण योजनेचे पैसे अडकले तर 'हे' काम करा! योजनेतील त्रुटी सुधारण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय
Ladki bahin yojana ekyc error physical verification process marathi : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. e-KYC प्रक्रियेतील गंभीर चुकांमुळे लाखो पात्र महिलांचा ₹१,५०० चा मासिक हप्ता अडकला आहे. या योजनेची सुरुवात २.४३ कोटी महिलांसाठी झाली होती, पण आता केवळ १.५७ कोटी महिलांनाच पैसे मिळत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, राज्य सरकारने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
'माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC करणे अनिवार्य होते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी नकळतपणे चुकीचे पर्याय निवडले. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल २४ लाख महिलांची चुकीने 'राज्य सरकारी कर्मचारी' म्हणून नोंद झाली. यामुळे त्या योजनेतून अपात्र ठरल्या आणि त्यांचा हप्ता थांबवण्यात आला.
आता होणार फिजिकल व्हेरिफिकेशन
e-KYC मधील गोंधळानंतर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, "ज्या महिलांची माहिती e-KYC दरम्यान चुकली आहे, त्यांची आता क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल."
व्हेरिफिकेशन प्रक्रिया कशी असेल?
- राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांच्या घरी जातील.
- त्या महिलांची कागदपत्रे आणि योजनेच्या निकषांनुसार त्यांची पात्रता प्रत्यक्ष तपासतील.
- या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल आणि पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
लाभार्थी संख्या का घटली?
सुरुवातीला योजनेत २.४३ कोटी महिला होत्या. e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि चुकीच्या नोंदींमुळे ही संख्या आता १.५७ कोटींवर आली आहे. सरकारच्या या नव्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या निर्णयामुळे लाखो अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
ज्या महिलांचा हप्ता थांबला आहे, त्यांनी आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून व्हेरिफिकेशनसाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा : जोपर्यंत 'देवा भाऊ' मुख्यमंत्री, तोपर्यंत लाडकी बहीण!,फडणवीसांची डरकाळी;'लखपती दीदीं'साठी नवा प्लॅन!












Click it and Unblock the Notifications