पालघर जिल्ह्यात 3.7० कोटीचं घबाड सापडलं , वाडा पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवणडणूकीचा प्रचार आता चांगलीच रंगत आली आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. पालघरमध्ये आज (9 नोव्हेंबर) वाहन तपासणी दरम्यान वाडा पोलिसांना 3.7० कोटी रुपयाची रक्कम सापडली आहे. एवढी मोठी रक्कम कोठून आली याबाबत वाहतुकीची पडताळणी दरम्यान आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ही रक्कम जप्त केली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार एका कारमधून ही रक्कम जप्त केली असून ती कार नवी मुंबईतील ऐरोली येथून विक्रमगडच्या वाडाच्या दिशेने निघाली होती. गाडीची मालकी असलेल्या कंपनीने ही रोख रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेत असल्याचा दावा केला आहे. एवढ्या मोठ्या रकमेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना सादर करता आली नाहीत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही रोख रक्कम जप्त केली, असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान याआधी 30 नोव्हेंबर रोजी पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती. जिल्ह्यातील उधवा येथे तलासरी पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली होती. एवढी मोठी रक्कम दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात येत असताना पोलिसांनी ही कारवाई केली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाबाबत आयोगाची 'झिरो टॉलरन्स' राखण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी अनेक एजन्सींना अवैध दारू, ड्रग्ज, मोफत वस्तू आणि रोख रक्कम यांचे वितरण आणि हालचाली रोखण्यासाठी संयुक्त पथके तयार करण्यास सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, उत्पादन शुल्क आयुक्त आणि अंमलबजावणी एजन्सी या दोन्ही निवडणुकांना तोंड देणारी राज्ये आणि त्यांच्या शेजारची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, राजीव कुमार यांनी आंतरराज्यीय सीमेवरील हालचालींवर कडक नजर ठेवण्यावर भर दिला आहे.












Click it and Unblock the Notifications