मनोज जरांगेंचे सोशल इंजिनिअरींग! निवडणुकीत सर्व समाजाला सोबत घेणार, उमेदवारीबाबतही हेच धोरण

Maharashtra Assembly Election 2024 : "मराठा समाजाच्या आंदोलनात सर्वांचेच योगदान आहे म्हणून मी आमच्या इच्छुकांना समजावून सांगणार आहे की, सर्वच उमेदवार उभे राहीले तर अवघड होईल. आम्ही मराठा, ओबीसी, महिला, शेतकरी आणि सर्व जाती, वर्गांना सोबत घेणार आहोत, उमेदवारीसंदर्भातह हेच धोरण असेल मात्र आज उमेदवारी जाहीर करणार नाही." असे वक्तव्य मराठा आंदोलन आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील निवडणूक लढवणाऱ्या ईच्छुकांच्या बैठकीप्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Maharashtra Assembly Election 2024

मनोज जरांगेचे वक्तव्य म्हणजे सर्व समाज आणि वर्गांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. उत्तरप्रदेशात मायावती यांनी सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग राबवला होता, आता मनोज जरांगेही महाराष्ट्रात सोशल इंजिनियरींगचा प्रयोग राबवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मी इच्छुकांना मत सांगणार, नाराज होणार नाही

"उमेदवारीचा हट्ट धरणाऱ्या इच्छुकांना समजावणार आणि मी माझे मतच सांगणार आहे, त्यांच्यावर नाराज होणार नाही, त्यांच्यावर रुसणारही नाही. मात्र समजून सांगायचे प्रयत्न मी करणार आहे." असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

आता काही दिवस कष्ट करा पाच वर्ष आपलीच

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजासाठी सर्वांचे योगदान आहे. समाजाचेही आंदोलनात मोठे योगदान आहे. त्यांना सुखी ठेवायचे असेल तर काही दिवस रात्रंदिवस जागावे लागेल. कष्ट जर केले तर पुढच्या पाच वर्षांत गोरगरीब जनता मग ती कोणत्याही जातीची असो ओबीसी, मराठा, शेतकरी असो सुखी राहतील.

श्रीमंतांवर मनोज जरांगेंचे भाष्य

मनोज जरांगे म्हणाले, गोरगरीब सत्तेत गेले तर त्यांचे प्रश्न मिटणार आहेत. श्रीमंत जर सत्तेत गेले काय नाही गेले काय त्यांना काही फरक पडणार नाही. परंतु गरीब शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कष्ट महत्वाचे आहे. हेच मी इच्छुकांना सांगणार आहे की, उभा राहण्याचा हट्ट धरला तर गोरगरीबांचे प्रश्न कसे सुटतील.

गोरगरीबांचे नुकसान होऊ नये

मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या हट्टापायी माझ्या गोरगरीब जनतेचे नुकसान होऊ देणार नाही कारण त्यांच्यासाठीच आपण हे सर्व करत आहोत. एक जागा उमेदवाराला दिली तर सर्वजण त्या उमेदवारांच्या पाठीशी राहा जर राहीले नाही तर मग तुम्ही राजकीय स्वार्थासाठी उमेदवारी मागता किंवा तुम्हाला गरीबांची, मराठ्यांची गरज नाही त्यांचे काम करायचे नाही.

इच्छुकांनो उमेदवारीचा हट्ट धरु नका

मनोज जरांगे म्हणाले, गोरगरीब इच्छुकांच्या भरवशावर आहे. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हट्ट करु नका. कारण इच्छुकांच्या हट्टापायी गोरगरीब जनतेचे नुकसान होणार आहे. जर एकाच मतदारसंघात जास्त इच्छुकांनी हट्ट धरला तर उपयोग नाही. एक माणूस उभा राहीला तर त्याला बळ मिळायला हवे.

मनोज जरांगेंची सोशल इंजिनिअरींग

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही ओबीसी, महिला, शेतकरी आणि सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधींना उमेदवारी देणार आहे. आता त्यांचे स्वप्न साकार व्हायला हवे. या बैठकीत निर्णय जाहीर होणार नाही. फक्त आज बैठक आहे. या समाजाच्या हितासाठी चांगले करण्याचा प्रयत्न आहे. समाजाच्या मुलांनी जर आपलेच ऐकले नाही तर मग उपयोग नाही. असे म्हणत त्यांनी सोशल इंजिनियरींगचा प्रयोग केला असे म्हणावे लागेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+