नदीत गेलेला व्हाॅलीबाॅलचा चेंडू काढताना MBBSचे विद्यार्थी वैनगंगेत बुडाले! 3 भावी डाॅक्टरांचा मृत्यू

Gadchiroli News Update 3 MBBS students drown in Wainganga river : येथून जवळच असलेल्या वैनगंगा नदीपात्रात व्हॉलिबॉल खेळायला गेलेल्या एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 1O मे रोजी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार गोपाळ गणेश साखरे (21, रा. भडगाव, जि.बुलढाणा) , पार्थ बाळासाहेब जाधव (20 रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी, जि. अहमदनगर) व स्वप्नील उदलसिंह शिरे (20, रा. आसारामबापू नगर, रांजणगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते.

Gadchiroli News Update Three MBBS students drown in Wainganga river

काय आहे घटना?

यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यांनी सांगितले की, आज दुपारनंतर या महाविद्यालयाचे पार्थ जाधव, गोपाल साखरे, स्वप्नील शिरे, पवन सत्कार,सुजीत देशमुख, शिवम जायभाये, सार्थक पाठक व जुनेद शेख हे आठ विद्यार्थी वैनगंगा नदीच्या कोरड्या पात्रात व्हॉलिबॉल खेळण्यासाठी गेले होते. खेळताना चेंडू प्रवाह असलेल्या पात्रात गेला. तो चेंडू उचलण्यासाठी पार्थ जाधव गेला. परंतु तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी तीन मुलं गेले. त्यापैकी सुजीत देशमुखला पोहता येत असल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, गोपाल साखरे व स्वप्नील शिरे दोघेही बुडाले.

हेही वाचा : इंडियन आयडल सीजन-12चा विजेता पवनदीप राजनचा अपघात; प्रकृती गंभीर, कार कंटेनरला धडकली

तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट

घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील असल्याने तेथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संध्याकाळपर्यंत शोध मोहीम राबविली. मात्र तिघांचेही मृतदेह आढळून आले नाही. रात्री अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डाॅक्टर, विद्यार्थ्यांची हळहळ

मागील वर्षी केंद्र शासनाने राज्यात नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती केली होती. त्यात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश होता. गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे प्रथम वर्ष होते. मात्र, तीन विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यासह पालकवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र दिनी बीडमध्ये भीषण अपघात; कांदा काढण्यासाठी निघालेल्या 3 महिलांवर काळाचा घाला, 15 जखमी

हेही वाचा : Uttarakhand News : उत्तरकाशीत हेलिकॉप्टर क्रॅश, 5 जणांचा मृत्यू! गंगोत्रीला जाताना दुर्घटना

हेही वाचा : रितेश देशमुखच्या फिल्म सेटवर मोठी दुर्घटना; ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, जेनेलिया व रेमोने घेतली धाव

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+