Uttarakhand News : उत्तरकाशीत हेलिकॉप्टर क्रॅश, 5 जणांचा मृत्यू! गंगोत्रीला जाताना दुर्घटना
Uttarakhand News Helicopter crashes in Uttarkashi : उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हेलिकाॅप्टरमध्ये असलेल्या सातपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज गुरुवार, 8 मे 2025 रोजी सकाळी घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
उत्तरकाशी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्घटना घडली. गंगोत्री धामच्या आधी हेलिकॉप्टर अपघात झाल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य तातडीने सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकाॅप्टरमध्ये सात जण होते, त्यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

हेलिकॉप्टरमधील चार प्रवासी मुंबईचे आणि दोन आंध्र प्रदेशचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी काही व्हिडिओ बनवले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मृतातील लोक हे भाविक असल्याची माहिती आहे.
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami has expressed grief over the death of 5 people in a helicopter crash near Gangani in Uttarkashi.
— ANI (@ANI) May 8, 2025
The Chief Minister has directed the administration to provide all possible assistance to the injured and investigate the accident. SDRF and… https://t.co/6RngfisdFS
हेही वाचा : इंडियन आयडल सीजन-12चा विजेता पवनदीप राजनचा अपघात; प्रकृती गंभीर, कार कंटेनरला धडकली
कुठे घडली हेलिकाॅप्टर दुर्घटना?
वनइंडिया हिंदीने स्थानिक लोकांच्या हवाल्यानुसार हेलिकाॅप्टर दुर्घटनेचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, उत्तर काशीच्या गंगनानीच्या पुढे आज सकाळी नऊ दरम्यान ही एक हेलिकाॅप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली. हे हेलिकाॅप्टर एका खासगी कंपनीचे होते. त्यात पायलटसह एकूण सात लोक होते.
हेही वाचा : Video: केदारनाथ यात्रेला सुरुवात: कसे जायचे? सुरक्षा कशी? हेलिकॉप्टर बुकिंग कसे? वाचा
चार धाम यात्रेदरम्यान दुर्घटना
चारधाम यात्रेच्या पार्श्वभुमीवर ही दुर्घटना घडली आहे. सध्या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरु असून पाऊसही पडत आहे अशा स्थितीत अलर्ट जाहीर करण्यात आला असतान ही दुर्घटना घडली आहे.
हेही वाचा : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, चारधाम यात्रेला सुरुवात, जाणून घ्या बद्रीनाथ धामची दारं कधी उघडणार?
गंगोत्रीला जात होते हेलिकाॅप्टरमधील प्रवासी
स्थानिक प्रशासनाने या घटनेसंदर्भात स्पष्टता दिली आहे. त्यानुसार, हे दुर्घटनाग्रस्त हेलिकाॅप्टर एका खासगी कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हेलिकाॅप्टर गंगोत्री येथे जात होते. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील प्रवाशांची स्थिती काय?
असे सांगण्यात येते की, सातप्रवाशांमध्ये मुंबईचे काही प्रवासी होते. आता यात नेमक्या कोणत्या प्रवाशांचा मृत्यू झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी पोलिसांसह आपत्तीव्यवस्थापन पथक, जलद कृती प्रतिसाद पथक आणि वैद्यकीय पथके तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.












Click it and Unblock the Notifications