Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, चारधाम यात्रेला सुरुवात, जाणून घ्या बद्रीनाथ धामची दारं कधी उघडणार?

Kedarnath Yatra 2025 dham doors opened today : जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बरोबर दहा दिवसांनी आज श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत हे मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील या प्रसंगी उपस्थित होते.

Kedarnath Yatra 2025

केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातली लाखो भाविक येत असतात याच पार्श्वभुमीवर चोख सुरक्षा व्यवस्थाही लावण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेची पुर्णतः काळजी घेण्यात येत असून उत्तराखंड सरकारही पुर्णतः दक्ष आहे. दरम्यान मंदिराचे दरवाजे उघडताच हेलिकाॅफ्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडल्यानंतर येथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील या प्रसंगी उपस्थित आहेत.यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी श्री केदारनाथाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी दर्शनासाठी उपस्थित असलेल्या भाविकांशी संवाद साधला.

भाविकांना त्रास होणार नाही अशी सोय- मुख्यमंत्री पुष्कर धामी?

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणतात, "30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने 4 धाम यात्रा सुरू झाली आहे. आजपासून दोन दिवसांनी भगवान बद्रीनाथ विशालचे दरवाजे देखील उघडतील आणि यात्रा पूर्ण वेगाने सुरू होईल. भाविकांचा प्रवास सुरक्षित राहावा आणि त्यांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत आणि यासाठी आम्ही योग्य व्यवस्था केली आहे."


बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडणार

केदारनाथ धामचे दरवाजे 2 मे रोजी उघडले आहेत, त्यानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडले जातील आणि हेमकुंड साहिबचे दरवाजे 25 मे 2025 रोजी भाविकांसाठी उघडले जातील. चारधाम यात्रेबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

  • उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या मुख्यालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जे 24 तास कार्यरत राहील.
  • नियंत्रण कक्ष 15 (पंधरा) ओळींचा टोल पर्यटन हेल्पलाइन क्रमांक 0135-1364 चालवतो.
  • याशिवाय, यात्रेशी संबंधित कोणतीही माहिती 0135-2552627, 2559898 या फोन क्रमांकांवरून मिळू शकते.
  • पर्यटन आणि धार्मिक व्यवहार आणि संस्कृती मंत्री सतपाल महाराज यांनी सांगितले की, 30 एप्रिल 2025 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रा सुरू होईल.

हेही वाचा : मुस्लिम असूनही, या अभिनेत्रीने केले आहेत देवीचे 16 उपवास, केदारनाथ-वैष्णोदेवीचं घेतलं आहे दर्शन

हेही वाचा : Chardham Yatra Update : भाविकांसाठी खुशखबर! आता चारधाम यात्रेसाठी 'ही' विशेष सुविधा

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+