Video: केदारनाथ यात्रेला सुरुवात: कसे जायचे? सुरक्षा कशी? हेलिकॉप्टर बुकिंग कसे? वाचा

पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ धाम यात्रेची सर्वात जास्त चर्चा सुरु होती. आजपासून ही यात्रा सुरु झाली. उत्तराखंडमधील चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचं धाम असणाऱ्या श्री केदारनाथ धाम येथील मंदिराची कवाडं शुक्रवारी उघडण्यात आली. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या सर्व यात्रा उत्तराखंडमध्ये येतात. आता या सर्व यात्रा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांना या यात्रेसाठी कसे जाता येईल, तेच आपण पाहूयात...

Kedarnath Yatra 2025

केदारनाथ यात्रा सुरु

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या केदारनाथ धाम मंदिराची कवाडे शीतकाळात अर्थात या भागात हिमवृष्टी सुरु झाल्यानंतर बंद केली जातात. पुन्हा ठराविक अवधीनंतर श्री केदार भाविकांच्या भेटीसाठी सज्ज होतात. यंदाच्या वर्षी केदारनाथ धाम येथील कवाडं 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर उघडण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पुरोहिचतांच्या मंत्रपठणानं हा संपूर्ण परिसर निनादून गेला. मंगलध्वनींनी केदारनाथ धाम परिसरात सकारात्मक लहरींचा वावर उपस्थितांना जाणवला.

पालखीचा नेत्रदीपक सोहळा

मंदिराची कवाडं खुली करण्यापूर्वी बाबा केदारनाथ यांची पवित्र पालखी काढण्यात येते. यंदाच्या वर्षी 27 एप्रिल रोजी उखीमठ इथं असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिरात भैरवनाथाच्या पुजेनं या यात्रेची सुरुवात झाली. यानंतर बाबा केदार यांच्या पालखीनं केदारनाथ धामच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. 28 एप्रिल रोजी बाबा केदार यांची पालखी गुप्तकाशी इथं पोहोचली. पुढे 29 एप्रिलला फाटा आणि 30 एप्रिल रोजी गौरीकुंड इथं ही पालखी पोहोचली आणि 1 मे रोजी ही पालखी केदारनाथ मंदिरात पोहोचली.

कशी आहे सुरक्षा?

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर आता केदारनाथ मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यात्रा मार्गावर १००० हून अधिक अधिकारी व सैनित तैनात आहेत. उत्तराखंड पोलिसांचे अतिरीक्त बळही तैनात आहे. बाँम्ब निकामी पथक, श्वान पथक यापूर्वीत आलेले आहेत. सोनप्रयाग ते धामपर्यंत १३९ कॅमेरे २४ तास देखरेख करत आहेत. यात्रेकरुनंना टोकन सिस्टिमने जावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेलिकॉप्टर कसे बुक करावे?

- केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर बुक करण्यापूर्वी, चारधाम यात्रेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे . नोंदणी करण्यासाठी, तुम्ही उत्तराखंड सरकारच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

- केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टर बुकिंग सेवा आयआरसीटीसी हेली यात्रेवर उपलब्ध आहे.

- यासाठी प्रथम अधिकृत पोर्टलवर म्हणजेच heliyatra.irctc.co.in वर जा आणि साइन-अप वर क्लिक करा.

- आता येथे विचारलेले सर्व तपशील जसे की तुमचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि तुमचे खाते तयार करण्यासाठी साइन-अप फॉर्म भरा जेणेकरून तुम्ही सेवा बुक करू शकाल.

- आयआरसीटीसी हेली यात्रा पोर्टलवर साइन इन केल्यानंतर, तुम्हाला आता तुमची प्रवास नोंदणी तपशील भरावा लागेल.

- अनेक यात्रेकरूंसाठी तिकिटे बुक करण्यासाठी, ग्रुप आयडी प्रविष्ट करा, तर एकाच व्यक्तीसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करण्यासाठी, अद्वितीय नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.

- प्रत्येक वापरकर्ता/बुकर आयडीसाठी जास्तीत जास्त ०२ (दोन) हेलिकॉप्टर तिकिटे बुक करता येतात. एका तिकिटावर जास्तीत जास्त सहा प्रवासी (०६) असू शकतात. म्हणजेच, एक वापरकर्ता/बुकर जास्तीत जास्त १२ प्रवाशांच्या गटासाठी एका आयडीसह २ तिकिटे बुक करू शकतो.

- १२ पेक्षा जास्त प्रवाशांसाठी तिकिटे बुक करण्यासाठी वापरकर्ता/बुकरला heliyatra.irctc.co.in वर दुसरा वापरकर्ता आयडी/बुकर आयडी तयार करावा लागेल.

- यानंतर पोर्टलवर तुमच्या प्रवासाची माहिती निवडा. गुप्तकाशी, फाटा किंवा सेर्सी येथील तुमच्या पसंतीची प्रवास तारीख आणि हेलिपॅड आणि विमान कंपन्यांपैकी एक निवडा.

- सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, पोर्टलवरील हेलिकॉप्टर फी पर्यायांवर जा. यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुम्ही तुमचे कन्फर्म केलेले तिकीट डाउनलोड करू शकता. प्रवास करताना ते सोबत ठेवा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+