रितेश देशमुखच्या फिल्म सेटवर मोठी दुर्घटना; ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, जेनेलिया व रेमोने घेतली धाव
Big accident on Riteish Deshmukh film set : अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. रितेश देशमुखचे सेटवरचे फोटो देखील सद्या व्हायरल होत आहे.
पण सेटवर 22 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना घडली. त्यामुळे रितेश देशमुख देखील दु:खात बुडाला आहे. संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास युनिटमधील एक ज्युनियर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटादरम्यान धक्कादायक घटना
या चित्रपटाचे शूटिंग सध्या साताऱ्यातील संगम माहुली मंदिर परिसरात सुरू होते. शूटिंग संपल्यानंतर सिनेमातील काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. संबंधित तरुणाचे नाव सौरभ शर्मा असून तो या सिनेमात डान्स आर्टिस्ट म्हणून काम करत होता.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेला सौरभ राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे. याप्रकरणी चित्रपटाची निर्मिती संस्था मुंबई फिल्म कंपनीने निवेदनही जारी केले आहे.

नेमकी घटना काय घडली?
गाण्याचे शुटींगमध्ये हळदीचा सीन असल्याने सर्वांच्या अंगावर, कपड्यांवर हळद होती. प्रत्येकाच्या वेशभूषेवर हळद लागली होती म्हणून सगळेजण नदीव अंघोळीसाठी गेले होत. तेव्हा नदीजवळ इतरही जण आंघोळ करत होते. मात्र पोहत असताना सौरभ अचानक नदीच्या मध्यभागी पोहोचला आणि त्या जागी तो बुडू लागला. ज्या ठिकाणी तो बुडाला त्या ठिकाणी मोठा भोवरा होता असं म्हटलं जातं.
नदीच्या भोवऱ्यात तो अडकला तो पुन्हा आलाच नाही
नदीत त्या ठिकाणी एकूण 3 भवरे आहेत. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सौरभचा शोध सुरू होता. त्याच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला असून रितेश देशमुखची टीम त्याच्या सतत संपर्कात आहे.
या धक्कादायत घटनेनंतर रितेशनेही काही काळासाठी चित्रपटाचं शुटींग थांबवलं आहे. या तरुणाला शोधण्याचं काम रेस्क्यू टीमकडून अद्याप सुरु आहे. दरम्यान या घटनेनंतर रितेश देशमुख आणि त्याच्या मुंबई फिल्म कंपनीने शुटींगचं काम थांबवलं आहे. तसेच रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीकडून सोशल मीडियावर निवेदनही जारी करण्यात आलं आहे.
मुंबई फिल्म कंपनीचं अधिकृत निवेदनात काय म्हटलंय?
"अत्यंत खेदाने शूटींग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत. संगम माहुली मंदिर, सातारा इते आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरु असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होतं. दुसऱ्या दिवशीचं पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात बुडाला.
सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता - दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले.
सौरभ ह्यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यासाठी वापर करण्यात आला. देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील आणि इतर संबंधित यंत्रणाशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली.
शोधकार्य अजुनही सुरु आहे. आम्ही ह्या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत. सौरभच्या कुटुंबीयांशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करत आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेलं आहे. - मुंबई फिल्म कंपनी. "












Click it and Unblock the Notifications