CM एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती, त्यांच्यासह कुटुंबातील कोणावर किती कर्ज, वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Election 2024, Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ उद्याचा दिवस उरला आहे. त्यामुळे राज्यभरात विविध पक्षाच्या नेत्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आज ठाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अशातच त्यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे किती संपत्ती आहे. 2019 च्या तुलनेत या निवडणुकीत त्यांच्या संपत्तीमध्ये किती वाढ झालेली आहे. त्यांच्यावर नेमकं कर्ज किती आहे.

ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्यावतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून एकनाथ शिंदे यांनी एकूण संपत्ती जाहीर झाली आहे. गेल्या 5 वर्षांत मुख्यमंत्री शिंदे यांच्या सपत्तीमध्ये वाढ झाल्याचे या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
2019 साली राज्याचे नगरविकास विभागाचे मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांची संपत्ती 11 कोटी रुपये एवढी होती. मात्र, 2022 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे, यंदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ते मुख्यमंत्री आहेत. 2024 ला मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत किती पटीने वाढ झाली याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्याची आकडेवारी प्रशस्तीपत्रातून समोर आली.
हे ही वाचा : शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात दाखल केला उमेदवारी अर्ज
संपत्तीत किती वाढ, कर्ज किती
सध्या त्यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये एवढी आहे. गत 2019 च्या तुलनेत ही संपत्ती 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपये कर्ज असून त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 रुपयांचं कर्ज आहे.
हे ही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी, 20 शिलेदारांची घोषणा; जाणून घ्या- कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
काय आहे प्रतिज्ञापत्रात उल्लेख
- मतदारसंघ - कोपरी पाचपाखाडी
- नाव - एकनाथ शिंदे
- वय - 60
- पक्ष - शिवसेना
- शिक्षण - बी.एस.सी.
- संपत्ती 2024 - 37,68,58,150
- संपत्ती 2019 - 11,56,72,466
- दाखल गुन्हे - 18
- गंभीर गुन्हे - ००
- जात - मराठा
हे ही वाचा : एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात 5 लाख कोटींची गुंतवणूक; 2.5 लाख रोजगार निर्माण होणार!
- जंगम मालमत्ता - 1,44,57,155 - पत्नी - 7,77,20,995 - एकूण - 9,21,78,150
- स्थावर मालमत्ता - 13,38,50,000 - पत्नी -15,08,30,000 - एकूण - 28,46,80,000
- कर्ज मालमत्ता - 5,29, 23,410 - पत्नी - 9,99,65,988 रुपये एवढं आहे.












Click it and Unblock the Notifications