शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी, 20 शिलेदारांची घोषणा; जाणून घ्या- कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेने आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे.
यामध्ये देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नुकतेच शिवसेनेत आलेले नीलेश राणे यांना देखील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
1.अक्कलकुवा - आमश्या पाडवी
2.बाळापूर- बळीराम शिरसकर
3.रिसोड - भावना गवळी
4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
6. परभणी - आनंद शेशराव भरोसे
7. पालघर - राजेंद्र घेड्या गावित
8. बोईसर (अज) - विलास सुकुर तरे
9.भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे
10. भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी
11.कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर
12.अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
13. विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
14. दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
15. अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल
16. चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
17. वरळी - मिलींद मुरली देवरा
18. पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे
19. कुडाळ - निलेश नारायण राणे
20. कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 27, 2024
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc #शिवसेना… pic.twitter.com/YfRdhV0U6K












Click it and Unblock the Notifications