शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात दाखल केला उमेदवारी अर्ज
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापुर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. तर मतदारसंघातील लोकांनी रस्त्यावर गर्दी करत मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. आज झालेल्या शक्तीप्रदर्शनातून त्यांच्या विजयाची नांदी दिसून येत होती.

उमेदवारी अर्ज दाखलपुर्वी मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यातील टेंभीनाका जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतींचे आशीर्वाद घेतले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या रॅली दोन रथ तयार करण्यात आलेलेल होते. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त वागळे इस्टेट, मॉडेला चेकनाका येथील दत्त मंदिर ते किसन नगर आयटीआय इमारत अशी भव्य रॅली काढण्यात आली.
#Live l 28-10-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 28, 2024
📍ठाणे चला भगवा फडकवूया!
🚩 🏹 उमेदवारी अर्ज दाखल करणे प्रसंगी भव्य नामांकन रॅली - लाईव्ह
https://t.co/jZPD8l230n
शिंदे साहेबांनी तब्येतीची काळजी घ्यावी- लता शिंदे
ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील वडील संभाजी शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश हे देखील उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे याच्या पत्नी लता शिंदे म्हणाल्या की, शिंदे साहेबांनी लोकांची काम केली आहेत. रात्रदिवस लोकांसाठी झटणारे व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांना फक्त एकच विनंती आहे की, त्यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. वेळेवर जेवण केले पाहिजे, बाकी आमची त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही.
धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा शिंदेंकडेच!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन देखील हजेरी लावली. यावेळी फडणवीस म्हणाले की, केवळ रक्ताच्या नात्याने वारसा येत नाही. वारसा विचाराने आणि कृतीने येतो. त्यामुळे विचाराने आणि कृतीने धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदेंकडेच आहे. आम्ही प्रत्येक निवडणूकीकडे आव्हान म्हणून पाहतो.

लोक पुन्हा आमच्याकडे सत्ता देतील. मुंबई महायुतीची ताकत आहे. त्यामुळे मुंबई मोदींजींच्या सोबत आहे. देशातील 52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे हे काँग्रेसी गुजरातचे अँबॅसिडर बनले आहे. हिंदूत्व हा आमच्यासाठी निवडणूकीचा नाही तर जगण्याचा मुद्दा आहे," असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना संत एकनाथ महाराजांच्या वंशजाचे आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभआशीर्वाद दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरच्या वारी निर्मळ वारी व्हावी यासाठी भगीरथ प्रयत्न केले. तसेच वारकरी दिड्यांना 20 हजारांचे अनुदान दिले.त्यामुळे आज नऊ संतांचे पूर्वज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ठाणे येथे येत आहेत. त्याची सुरुवात एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यापासून झाली.












Click it and Unblock the Notifications