एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा झटका! नगर'विकास' खात्याचे घोडे अडणार!
Devendra Fadnavis Tightens Grip on eknath Shinde's Urban Development Funds : राज्यात एकीकडे महायुती सरकार गुण्यागोविंदाने नांदत असले तरीही सरकारचा संसार हाकताना तु-तु मै-मै होत आहे, आणि भांड्याला भांडं लागत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवडत्या नगरविकास खात्याचे घोडे अडवले जात असून ही राजकीय चाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळली असल्याचे दिसून येत आहे..
या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे याना देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपुर्वी झटका दिल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात महायुती सरकारमध्ये पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे होती आणि नगरविकास खातेही त्यांच्याकडेच होते, पण दुसऱ्या टर्ममध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांची जागा एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या कारभारावर अकूंश लागला असे बोलले जात आहे. तर नगरविकास खात्यालाही अंकूश लागल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निधीची रक्कम खर्च करण्यावर अंकूश लावल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय नगर'विकास' खात्याचे घोडे अडणार!
नगरविकास खात्यातील मोठ्या रकमेचे वाटप करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असेल यामुळे आता आमदारांना या खात्यामार्फत निधी मंजुर करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांची सहीनंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाईल. मुख्यमंत्र्यांनी जर या निधी वाटपाला मंजुरी दिली तर निधीचे वितरण होईल.
सढळ हाताने होणाऱ्या निधीवाटपाला बसेल चाप
मीडिया रिपोर्टनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात निधी वाटप सढळ हाताने होऊ शकते, त्यामुळे शिवसेनेत येणाऱ्यांची संख्याही वाढू शकते आणि पक्षात येणाऱ्या नगरसेवकांना हा निधी सढळ हाताने वाटप होऊ शकतो ही आर्थिक रसदच ठरत असून त्यामुळे निधीचे महापालिकांमध्ये समान निधी वाटप होणार नाही अशी शक्यता वाढू शकते, त्यामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? उद्धव ठाकरेंकडून वाढदिवसानिमित्त कौतुक; नेमके काय म्हणाले?
हेही वाचा : आज देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस, मुख्यमंत्र्यांच्या तुम्हाला माहीत नसलेल्या 'या' गोष्टी जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications