"अल्ला हू अकबर" या वाक्याचा अर्थ काय? कधी वापरले जाते हे वाक्य.. घ्या जाणून
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 26 लोकांचा बळी दहशतवाद्यांनी घेतल. अशा स्थितीत आता भारतात या कृतीचा संताप व्यक्त होत आहे, दहशतवाद्यांनी जो निंदनिय प्रकार केला त्याला पाकिस्तानचे समर्थन असल्याचे आता म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर भारतानेही काही ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पहलगाम हल्ल्याचे काही व्हिडिओ आता समोर येत आहे. अशातच एक ताजा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात दहशतवादी गोळीबाराला सुरुवात करताना जीपलाईन आपरेटर अल्ला हु अकबर म्हणताना दिसत असल्याचा पर्यटकाचा दावा आहे. आता या ऑपरेटरला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने बोलावले आहे.
पहलगाम हल्ल्याचा ताजा व्हिडिओ व्हायरल
पहलगाम येथे झालेल्या भीषण आणि निर्दयी हल्ल्याचा ताजा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जिपलाईन करताना पर्यटकाच्या कॅमेरात दहशतवादी हल्ला चित्रित झाला आहे. हा व्हिडिओ जेव्हा तपासयंत्रणेच्या हाती लागला तेव्हा या जीपलाईन ऑपरेटरला एनआयएने चौकशीसाठी बोलावल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे.
काय म्हणतो जीपलाईन ऑपरेटर?
या व्हिडिओत जीपलाईन ऑपरेटर दिसत आहे. पर्यटकाचा दावा आहे की, ज्यावेळी गोळीबार सुरु होताच हा जीपलाईन ऑपरेटर "अल्ला हु अकबर" म्हणताना दिसतो.
"अल्ला हू अकबर" शब्दाचा अर्थ काय?
"अल्ला हू अकबर" हा असा अरबी शब्द आहे जो जास्त करुन मुस्लीम समाज अजानमध्ये आणि महत्वाच्या क्षणाला उच्चारतात. इस्लाम धर्मानुसार, "अल्ला हू अकबर" या उक्तीचा अर्थ म्हणजे अल्लाह हे सर्वात मोठे आहे आणि अल्लाह सर्वात महान आहे. इस्लाम धर्मातील हा पवित्र वाक्य आहे ज्यावर धर्माचे अनुयायी याचा जप करतात. धार्मिकदृष्ट्या या वाक्याला आणि त्याच्या अर्थाला खूप मोठे महत्व आहे.
कधी म्हणतात .." अल्ला हु अकबर"
अल्ला हू अकबर या उक्तीला मुस्लीम समाज आपल्या आनंद, प्रार्थना, संकट आणि दुःखद क्षणी वापरली जाते. जेव्हा कुणी मुस्लीम मुलं जन्म घेतं त्यावेळी सर्वात आधी त्याच्या कानात अल्ला हु अकबर म्हटले जाते.
हेही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याने व्यथित मुस्लिम महिलेने सनातनचा स्वीकार केला! हिंदूरक्षा दलाचा दावा
हेही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो
हेही वाचा : पहलगाम हल्ला : 'अल्लाहू अकबर' घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला NIAने बोलावले चौकशीला!












Click it and Unblock the Notifications