"काँग्रेसचा काळा इतिहास उघडकीस"अमित शहांच्या राज्यसभेतील त्या वक्तव्यावर PM मोदींचे विरोधकांना उत्तर

Narendra Modi's Reply to Opponents : राज्यसभेत मंगळवारी (17 डिसेंबर) राज्यघटनेवर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानानंतर मोठा गदारोळ माजला आहे. या विधानानंतर काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदी संतप्त झाले आहेत.

काँग्रेससह विरोधी पक्षाची निदर्शने

बुधवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आतून आणि बाहेरून निदर्शने केली. अमित शहा यांनी आपल्या भाषणात संविधानाचे निर्माते बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांना उत्तर दिले आहे.

Narendra Modi s Reply to Opponents

अमित शहांच्या आंबेडकरांबाबत वक्तव्यावरुन मोदींची एक्सवर पोस्ट

X वर पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. राज्यसभेत आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा काळा इतिहास अमित शहांनी उघड केला आहे, असेही ते म्हणाले आंबेडकरांबद्दल काँग्रेसच्या गदारोळावर, पीएम मोदी म्हणाले, "जर काँग्रेस आणि त्यांच्या कुजलेल्या इकोसिस्टमला त्यांचा खोटेपणा आणि त्यांचे अनेक वर्षांचे दुष्कृत्य ते लपवू शकतात, असे वाटत असेल पण त्यांचा विशेषत: डॉ. आंबेडकरांबद्दल अनादर पुर्वापार आहे.

हेही वाचा : राज्यसभेत अमित शहा आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?, काँग्रेसने का केली राजीनाम्याची मागणी?, वाचा सविस्तर

मोदींची घराणेशाहीवर प्रखर टीका

पीएम मोदींनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली. "एका घराणेशाहीच्या नेतृत्वाखालील पक्षाने डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्याचा आणि एससी/एसटी समुदायांचा अपमान करण्याचा कसा प्रयत्न केला हे वारंवार पाहिले आहे. यासाठी प्रत्येक संभाव्य घाणेरड्या युक्तीचा वापर करण्यात आला आहे." असेही मेोदी यांनी म्हटले आहे.

पीएम मोदींच्या एकामागून एक पोस्ट

पंतप्रधान मोदींनी एकामागून एक पोस्ट करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच अमित शहांच्या राज्यसभेतील भाषणावर ते म्हणाले, "संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्याचा आणि एससी/एसटी समुदायांकडे दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचा काळा इतिहास उघडकीस आणला. त्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीवरून ते स्पष्टपणे भयभीत झाले आहेत. ते आता नाटकीपणा करत आहेत. लोकांना सत्य माहित आहे!

हेही वाचा : Mahaparinirvan Diwas 2024 :डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 'हे' आहेत चित्रपट नाटकं अन् मालिका

काँग्रेसवर गंभीर आरोप

PM मोदी पुढे म्हणाले, 'भारतीय जनतेने वेळोवेळी पाहिले आहे की एका घराणेशाहीच्या नेतृत्वाने प्रत्येक संभाव्य घाणेरड्या युक्तीचा वापर केला आहे. आंबेडकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसनेच नकार दिला होता आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेला स्थान न दिल्याचा आरोपही मोदींनी केला.

हेही वाचा : बाळासाहेबांचे काँग्रेससोबत होते वैचारिक मतभेद; शिवसैनिकांचे जीव गेले, काँग्रेस-शिवसेनेचे नाते कसे?

काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला - पीएम मोदी

पीएम मोदींनी पोस्टमध्ये लिहिले की, 'डॉ. आंबेडकरांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत केले होते. पंडित नेहरूंनी त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांचा पराभव हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. त्यांना भारतरत्न देण्यास नकार दिला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या पोर्ट्रेटला मानाचे स्थान दिले नाही या गोष्टी काँग्रेसच्या पापाच्या यादीत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+