Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahaparinirvan Diwas 2024 :डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 'हे' आहेत चित्रपट नाटकं अन् मालिका

Mahaparinirvan Diwas 2024 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव ज्याला ज्ञानाचा महासागरही म्हणतात अन् विश्वरत्नही संबोधतात. या महामानवाने भारतीय समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव होतो ती घटना देशात एक आदर्श उदाहरण आहे. एक निष्णात वकील, राजकारणी, पत्रकार, लेखक, तत्वज्ञ अशी अनेक संबोधनं त्यांना लावली तरीही कमीच पडतील.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे अस विकिपीडियात माहिती नमूद आहे.

Mahaparinirvan Diwas 2024

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कार्यावर अनेक चित्रपट, नाटकं आणि टीव्ही मालिका आल्या आहेत. ते कोणते आहेत हे आपण पाहूया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी चित्रपट

वर्ष चित्रपट भाषा दिग्दर्शक/निर्माता डबिंग

  • 1990 भीम गर्जना मराठी
  • 1991 बालक आंबेडकर, कन्नड, हिंदी भाषेतही डब
  • 1993 युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठी
  • 2000 डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंग्रजी, जब्बार पटेल
  • 2005 डॉ. बी.आर. आंबेडकर, कन्नड
  • 2019 रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) मुळ मराठी, हिंदीत डब

डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांच्यावर आधारित चित्रपट

  • 2010 शूद्रा: द राइझिंग हिंदी संजीव जायस्वाल
  • 2016 रमाबाई कन्नड
  • 2016 बोले इंडिया जय भीम मराठी (हिंदीतही डब)
  • 2021 जय भीम तमिळ (हिंदीतही डब)

टीव्ही मालिका

  • डॉ. आंबेडकर - दुरदर्शन वाहिनीवरील एक हिंदी मालिका
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा - स्टार प्रवाह वाहिनीवर एक मराठी मालिका
  • एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर : - अँड टीव्ही वाहिनीवर एक हिंदी मालिका

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील नाटके

मी डॉक्टर आंबेडकर बोलतोय ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे

युगपुरुष ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे

चलो बुद्ध कि ओर... (हिंदी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे

रमाई (मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ

नवी कहाणी... (हिंदी आणि मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे

गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी

वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)

डॉ. आंबेडकर आणि गांधीजी - नाटक
प्रतिकार - नाटक

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+