Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

BSF jawan : बीएसएफ जवानाने चुकून सीमा ओलांडली अन् पाकिस्तानी सैन्यांनी पकडले! सुटकेसाठी प्रयत्न

BSF jawan PK Singh : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांसाठी अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय सीमा सुरक्षा बलाचा जवान चुकून पंजाबची सीमा पार गेला अन् पाकिस्तानी सैन्याने या सैनिकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेला फोटो आता समोर आला आहे.

विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, या जवानाच्या मुक्ततेसाठी दोन्ही देशांच्या सुरक्षा बलांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या जवानाच्या मुक्ततेची आशा आहे.

BSF jawan PK Singh

Photo credit - ANI

पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात असलेला कोण आहे सैनिक?

भारतीय 182 व्या बटासलीयनचे काॅन्स्टेबल पीके सिंह हे यांनी चुकून भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. ही घटना काल म्हणजेच 23 एप्रिल 2025 रोजीची आहे. या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय जवानाला ताब्यात घेतले आहे.

पीके सिंह हे वर्दीत होते आणि त्यांच्याकडे सर्व्हीस रायफल होती. सावलीत आरामासाठी ते पुढे सरसावले त्यावेळी त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने पकडल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन्ही देशाच्या सुरक्षा बलाची फ्लॅग मिटिंग

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात असलेले पीके सिंह यांच्या मुक्ततेसाठी दोन्ही देशातील सुरक्षा बलाची फ्लॅग मिटिंग सुरु आहे. तसे पाहता हे प्रकरण आता नवीन नाही पण सध्या भारत पाकिस्तान संबंध आणि पहलगाम हल्ल्याच्या धर्तीवर भारताने उचललेले ठोस पाऊल यामुळे आता या जवानाच्या मुक्ततेसाठी काय प्रयत्न केले जातात हे लवकरच समजेल.

कसा गेला जवान पाकिस्तानच्या हद्दीत?

भारत-पाक सीमेवर कंटीली तारच्या दुसऱ्या बाजूला नो मॅन्स लँडमध्ये झीरो लाईनजवळ शेतकरी पीक कापणी करत होते. या जमीनीवर विशेष परवानगी घेऊन शेतकरी पिकं लागवड करतात. तिथे लागवड आणि पीक कापणीवेळी शेतकऱ्यंसोबत जवान तैनात असतात. शेतकऱ्यांचे काम सुरु असताना त्यावेळी या शेतकऱ्यांवर हा जवान तैनात होता. झिरो लाईनवर केवळ पिल्लर लावलेले आहेत. ऊन जास्त असल्याने तैनात असलेला जवान सावलीसाठी थोडा पुढे झाडाडवळ गेला तेव्हा त्याने पिल्लर क्राॅस केली आणि चुकून जवान पाकिस्तानी हद्दीत गेला. यादरम्यान त्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने पकडले.

हेही वाचा : 'दहशतवाद्यांनी माणुसकीची हत्या केली'; पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धाजंली!

हेही वाचा : Pahalgam Attack : 'पाकिस्तानचे पाणी रोखले, दूतावास बंद, नो व्हिसा', सीसीएस बैठकीतील 5 मोठे निर्णय

हेही वाचा : Pahalgam attack : कलमा म्हणजे काय? तो कधी वाचतात? 28 निष्पापांचा बळी घेतल्यावर समोर आले 'हे' प्रश्न

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+