'दहशतवाद्यांनी माणुसकीची हत्या केली'; पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धाजंली!
pahalgam attack tribute shradhanjali message : पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा हल्ला झाला.
मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर देखील हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तर दहशतवाद्यांचा खात्मा केला जावा, अशी मागणी देखील केली जात आहे.

येथे, सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद आहे, जो पाकिस्तानात उपस्थित आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात 5 दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवादी होते.

दुसऱ्या दिवशी बैठकांचे सत्र
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीनगर ते दिल्ली अशा अनेक बैठका झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली.
पंतप्रधान निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली अडीच तासांची बैठक झाली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या
भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध!
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी
पडलेल्या सर्व पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

दहशतवादाची ही घटना कधीही विसरता येणार नाही,
त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे...मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

22/04 हा दिवस भारतीय कधीही विसरू शकत नाहीत.
भ्याड हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पहलगाममधील हल्ल्यामुळे पिडीतांचे कुटुंब हादरले.
त्या कुटुंबाला हिंमत मिळावी.
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

या भ्याड हल्ल्यातील माथेफिरुंना देश विसरणार नाही.
हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पहलगाम दहशतवादी हल्ला एका विशिष्ट धर्माचा नाही,
तर विकृत मानसिकतेचा होता,
हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो!

निष्पाप व निहत्या लोकांचे जीव घेण्यात कोणता आलाय धर्म?
या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध.! मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली

संपूर्ण देश या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या
पाठीशी ठामपणे उभा आहे. दहशतवाद्यांनी विकृत मानसिकता संपवावी!
शहीद झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अपराध्यांना अशी शिक्षा करा, की त्यांच्या सात पिढ्या पुन्हा असा विचार देखील करणार नाहीत.
पहलगाममधील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

हा हल्ला भ्याड होता. हा हल्ला डरपोक लोकांचा होता.
हल्ल्याचा तीव्र निषेध व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

देश २२ एप्रिलची घटना कधीही विसरणार नाही.
हल्ल्यातील मृतांना हा देश कधीही विसरणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली !
ही वेळ नाही राजकारणाची, ही वेळ आहे दहशतवाद्यांना संपविण्याची!
पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पहलगामध्ये दहशतवाद्यांनी मानवतेची हत्या केली,
पर्यटकांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली...!
दहशतवाद ना जात पाहतो, ना धर्म,
त्याला केवळ विनाश हवा असतो
निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचा जाहीर निषेध!
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!












Click it and Unblock the Notifications