Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अल्लू अर्जुनचा 42 व्या वर्षीही नजर लागावा असा फिटनेस, पुष्पा 2 स्टारचा काय आहे Diet Plan? वाचा

Pushpa 2 allu arjun shares his diet-and fitness plan : 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा अल्लू अर्जुन अनेकांच्या दिलाची धडकन बनला आहे. त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मुव्ही पार्टने देशात खळबळ उडवून दिली. जिकडे तिकडे त्याच्याच मुव्हीची चर्चा आहे. त्यातच त्याच्या देहयष्टी आणि व्यक्तिरेखाबद्दलही चर्चा होत आहे. तो एवढा तंदुरुस्त कसा आहे यासंदर्भात त्यानेच अलीकडेच एक खुलासा केला आहे.

त्याने त्याच्या चित्रपटासाठी काटेकोर आहार पाळतो पण पुष्पा 2 साठी त्याने या गोष्टी सामान्य ठेवल्या. एका मुलाखतीत त्याने यासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्याचा वर्कआउट रूटीन देखील खास होता, ज्यामध्ये धावणे ही महत्वाची गोष्ट होती.

Pushpa 2 allu arjun shares his diet-and fitness plan

काय आहे अल्लू अर्जूनच्या फिटनेसचे रहस्य?

अल्लू अर्जुनने संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे त्याच्या फिटनेसचे मुख्य रहस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे फिटनेससाठी बरेच कष्ट आणि संघर्ष करावा लागतो हे स्पष्टच आहे.

हेही वाचा : Allu Arjun Net Worth: 300 कोटींची फी, 100 कोटींचे घर, कोटींच्या संपत्तीचा मालक आहे अल्लू अर्जुन

'पुष्पा 2'दरम्यान अल्लू अर्जुनची डाएट

  • 'पुष्पा 2' चित्रपट शुुटींग आणि इतर काळात अल्लू अर्जुनचा रोजचा नाश्ता जवळपास सारखाच असायचा. अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा त्यात समावेश असतो.
  • दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्याने ब्राऊन राइस, रताळे, गव्हाची भाकरी आणि विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या.
  • स्नॅक्समध्ये सुकामेवा, खाद्य बिया आणि फळांचा समावेश त्याच्या आहारत आहे.
  • अल्लू अर्जुनला काही दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असल्याने तो टाळतो.
  • अल्लू अर्जूनचा आहार मध्यम आणि संतुलित होता. ज्यामुळे त्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत झाली.

मी दररोज 45 मिनिटे धावतो

अल्लू अर्जुन त्याच्या सकाळच्या दिनचर्याचे वर्णन करताना, "मी रोज सकाळी एक तास रिकाम्या पोटी 45 मिनिटे धावतो ." या व्यायामाचा त्यांच्या फिटनेसवर खोलवर परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रिकाम्या पोटी धावल्याने चरबीच्या ऊतींमध्ये लिपोलिसिस वाढते, ज्यामुळे चरबीचे ऑक्सिडेशन सक्रिय होते. परिणामी, शरीर जास्त प्रमाणात चरबी वापरते, ज्यामुळे वजन कमी होते आणि शरीरात अधिक ऊर्जा येते. रिकाम्या पोटी धावण्याने चयापचय गतिमान होतो, ज्यामुळे फिटनेस राखण्यास मदत होते.

हेही वाचा : अल्लू अर्जुनने रात्रभर तुरुंगात काय केले..? पोटभर जेवला नाही, नीट झोपलाही नाही; वाचा, इत्यंभूत माहित

जिमनास्टिक व्यायाम करतो अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन जिमनास्टिक व्यायाम (कॅलिस्थेनिक्स) करतो. यामुळे त्याला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही आणि ते कुठेही केले जाऊ शकते. कॅलिस्थेनिक्स शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यास, सहनशक्ती वाढविण्यास आणि संतुलन सुधारण्यास मदत करते. हा व्यायाम थंड आणि कठोर वर्कआउट्सच्या पलीकडे एक प्रभावी पर्याय आहे, जो शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

अल्लू अर्जुन हा आठवड्यातून तीन दिवस करतो, ज्यामुळे त्याचे शरीर मजबूत आणि लवचिक राहते. या प्रकारच्या व्यायामामुळे त्यांचा फिटनेस आणि कार्यक्षमता सुधारते.

हेही वाचा : Sneha reddy net worth : कोण आहे पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनची पत्नी? किती आहे तिची संपत्ती, घ्या जाणून

2024 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने भारतात जवळपास 1 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+