Allu Arjun Net Worth: 300 कोटींची फी, 100 कोटींचे घर, कोटींच्या संपत्तीचा मालक आहे अल्लू अर्जुन
Allu Arjun Net Worth: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. अल्लूला त्याच्या हैद्राबाद येथील घरातून पोलिसांनी आज 13 डिसेंबर 2024 (शुक्रवार) रोजी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रिमिअर शो 4 डिसेंबरला संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटर परिसरात प्रेक्षकांची तुडूंब गर्दी जमली होती तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे.

अल्लू अर्जुनच्या पीआर टीमचं म्हणणे आहे की, पोलिसांनी अभिनेत्याला केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुन केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरात प्रचंड लोकप्रिय आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाची 1100 कोटींची कमाई
अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या रिलीजपासून खूप चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाने आतापर्यंत 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने अल्लू अर्जुनची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. तर चला मग त्याची नेट वर्थ आणि वार्षिक कमाई याबद्दल जाणून घेऊया.
अल्लू अर्जुन 460 कोटींच्या संपत्तीचा मालक
अल्लू अर्जुन आलिशान लक्झरी लाइफ जगतो. साऊथ इंडस्ट्रीतील श्रीमंत कलाकारांमध्ये त्यांची गणना होते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी 150 ते 200 कोटी रुपये फिस म्हणून घेतो. अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' चित्रपटासाठी मेकर्सकडून 300 कोटी रुपये घेतले असल्याचे बोलले जात आहे.तर अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 460 कोटी रुपये आहे.
अल्लू अर्जुनचं आलिशान घर
अल्लू अर्जुन अतिशय लक्झरी लाइफ जगतो. हैदराबादच्या ज्युबली हिल्स येथील एका आलिशान बंगल्यात तो आपल्या कुटुंबासह राहतो. त्यांचे हे घर खूप सुंदर आहे. घराचे इंटीरियर अतिशय अप्रतिम आहे. या आलिशान घरात खाजगी पूल देखील आहे. या बंगल्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. हैदराबादमधील या घराशिवाय अल्लू अर्जुनने 2015 मध्ये मुंबईत एक आलिशान अपार्टमेंटही खरेदी केले होते.
अल्लू अर्जुनला महागड्या गाड्यांचा शौक
अल्लू अर्जुनला महागड्या गाड्यांचाही खूप शौकीन आहे. त्याच्याकडे उत्तम गाड्यांचा संग्रह आहे. यामध्ये प्रामुख्याने रेंज रोव्हर वोग, हमर H2, व्होल्वो XC90 T8 एक्सलन्स, मर्सिडीज GLE 350d, Jaguar XJ L आणि BMW X6 M Sport यांचा समावेश आहे. या सर्व वाहनांची किंमत लाखोंच्या घरात आहे. तसेच अल्लूकडे स्वतःचे खाजगी जेट देखील आहे. यासोबतच वैयक्तिक व्हॅनिटी व्हॅन 'द फाल्कन' आहे, ज्याची किंमत 7 कोटी रुपये आहे.
अल्लू अर्जुन अशी करतो कोट्यावधीची कमाई
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन तेलगू चित्रपट उद्योगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अनेक व्यवसायांमधून चांगली कमाई करतो. चित्रपटांव्यतिरिक्त अल्लू अर्जुन ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया पोस्ट आणि स्टेज शोमधूनही भरपूर कमाई करतो. तसेच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अहा चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही मोठी कमाई करतो.
अल्लू अर्जुनचे इंस्टाग्रामवर 25 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मिडीयाच्या प्रमोशनल पोस्टमधून भरपूर कमाई करतो. सोशल मीडियावर उत्पादनांची जाहिरात करून तो चांगली कमाई करतो.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अल्लू अर्जुन KFC, Frooti, Rapido, Hero Motocop, RedBus आणि Hotstar सारख्या ब्रँडला एंडोर्स करतो आणि प्रत्येक ब्रँडसाठी 6 ते 7 कोटी रुपये आकारतो.
अल्लू अर्जुनची व्यवसायात मोठी गुंतवणूक
अल्लू अर्जुन हा हैदराबादमधील लोकप्रिय अमेरिकन स्पोर्ट्स बार आणि रेस्टॉरंट चेनचा मालक आहे. याशिवाय त्यांनी हेल्थकेअर ब्रँडमध्येही गुंतवणूक केली आहे. 2022 मध्ये अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये अल्लू स्टुडिओ नावाचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी गीता आर्ट्स देखील आहे. जून 2023 मध्ये अल्लू अर्जुनने अमीरपेट, हैदराबाद येथे मल्टिप्लेक्स व्यवसायात प्रवेश केला आहे. त्याच्याकडे अमेरिकन रेस्टॉरंट चेन बफेलो वाइल्ड विंग्सची फ्रेंचायझी देखील आहे.












Click it and Unblock the Notifications