ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नात घडलं होतं नाराजी नाटय, या सुपरस्टारने परत केली होती लग्नपत्रिका

Abhishek Bachchan And Aishwarya Rai: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बॉलिवूडच्या या कपलमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसत नाहीत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच ही दोघं एकत्र दिसले नव्हते. या लग्न सोहळ्यात ही ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसली होती. त्यामुळे या कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांणा उधाण आलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, शत्रुघ्न सिन्हा हे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आमंत्रण असतानाही आले नव्हते.

Abhishek Bachchan and Aishwarya Rai

अमिताभ बच्चन यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक बच्चनचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. या लग्नाचं अनेकांना निमंत्रण पाठवलं होतं. ज्यामध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच ही नाव होतं. मात्र त्यांनी लग्नपत्रिका आणि मिठाई परत पाठवली होती. खुद्द अभिषेक बच्चनने करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये याचा खुलासा केला होता.

अभिषेक बच्चन म्हणाला, 'माझे वडील अमिताभ बच्चन जी यांनी सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेकांना कार्ड पाठवले होते. सगळ्यांना माहीत होतं की, आमच्या आजीमुळे आम्हाला हे लग्न खाजगी ठेवायचं होतं. पण लग्नपत्रिका परत करणारी एक व्यक्ती होती. ते म्हणजे शत्रुघ्न सिन्हा होते.आपण एकाच वेळी सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. हे आपण स्वीकारले पाहिजे.

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांना बद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी म्हणाले की,"जर बोलवायचं नव्हतं तर "मिठाई कशासाठी? मिठाई स्वीकारून मला त्यांना लाजवायचं नव्हतं. मला किमान अपेक्षा होती की, अमिताभ किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी मिठाई पाठवयाच्या आधी मला फोन करतील.पण तसं झालं नाही, तर मग मिठाई कशाला ?"

अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नात अनेक बड्या स्टार्सना बोलावले नव्हतं असं म्हटलं जातं. हे लग्न खाजगी ठेवण्यात आले होते. कारण अभिषेकची आजी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होती आणि लग्न असेच व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+