"..हीच मानसिकता हिंदूंना लक्ष्य करते!" पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी क्रिकेटरने व्यक्त केला संताप
Pahalgam terror attack today in Marathi : पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता मृतांचा अधिकृत आकडा आणि नावे समोर येत आहेत. अशा स्थितीत देशातच नव्हे तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. समस्त भारतीयांमध्ये तर या हल्ल्यामुळे संताप व्यक्त झाला आहे.

चार धाम यात्रेपैकी महत्वाची मानली जाणारी बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा काही दिवसांवर आली असतानाच काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर भीषण हल्ला झाला. दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. रिपोर्टनुसार, हिंदूंना लक्ष्य केले गेले असे दिसून येत आहे. तसेच पर्यटकांनाच लक्ष्य केले गेले आहे. त्यामुळे आता हा हल्ला पूर्वनियोजित होता हे उघड होत आहे.
Another brutal attack in Pahalgam. From Bangladesh to Bengal to Kashmir, the same mindset targets Hindus. But 'seculars' and judiciary insist the attackers are 'oppressed minorities.' Victims deserve justice. pic.twitter.com/GtA5WpFjIr
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 22, 2025
पाकिस्तानी खेळाडू म्हणाला - न्याय हवा
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत आज सकाळी संक्षिप्त बैठक घेतली. त्यानंतर आता सुरक्षेसंदर्भात पुढील रुपरेषा ठरवली जात आहे. याच घटनेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या एका माजी खेळाडूंने आपला संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाला पाकिस्तानी क्रिकेटपटू?
एकेकाळचा पाकिस्तानी क्रिकेट संघात गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असलेला फिरकीपटू दानिश कानेरिया याने पहलगाम हल्ल्यातील मृत आणि जखमींविषयी संवेदना व्यक्त केली आहे. पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा असे म्हणत त्यांनी हिंदुंना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे.
काय आहे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे ट्विट
"पहलगाममध्ये आणखी एक क्रूर हल्ला. बांगलादेशपासून बंगालपर्यंत काश्मीरपर्यंत हीच मानसिकता हिंदूंना लक्ष्य करते. पण 'धर्मनिरपेक्ष' आणि न्यायव्यवस्था हे हल्लेखोर 'oppressed minorities.' 'अत्याचारीत अल्पसंख्याक' असल्याचे ठासून सांगतात. पीडितांना न्याय मिळायला हवा." असे दानिश कानेरीयाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सांगायचे झाल्यास, दानिश कानेरिया पाकिस्तान संघाचा एकेकाळचा जरी खेळाडू असून तो पाकिस्तानकडून जरी खेळत असला तरीही आपल्या धर्मबांधवावर झालेल्या हल्ल्याच्या समर्थनार्थ तो पुढे आला आहे. या खेळाडूला हिंदू असल्यामुळे पाकिस्तानकडून खेळताना भेदभावाला सामोरे जावे लागले होते असेही बोलले जाते तसेच त्याच्या करीअरमध्ये केवळ धर्म आड आल्याने अडथळे आणले गेले असे न्यूज18 च्या वृत्तात आहे.
हेही वाचा : पहलगाम हल्ल्यावर PM मोदी म्हणाले- हल्लेखोरांना सोडणार नाही! पर्यटकांवर कधी आणि कसा झाला हल्ला? वाचा
हेही वाचा : आलिशान गाड्यांचा शौकीन, भारताविरुद्ध जहरी भाषण, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईड सैफुल्ला खालिद कोण? वाचा












Click it and Unblock the Notifications