आलिशान गाड्यांचा शौकीन, भारताविरुद्ध जहरी भाषण, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईड सैफुल्ला खालिद कोण? वाचा
Pahalgam attack : पहलगाम, जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी 22 एप्रिलला हा हल्ला झाला.
या हल्ल्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने घेतली आहे. लष्कर-ए-तैयबाचे प्रतिरुप ही संघटना असून फ्रंट ग्रुप म्हणून काम करते. या हल्ल्यामागे सैफुल्ला खालिदचा हात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता सैफुल्लाह खालीदबद्दल माहिती घेतली जात आहे.

कोण आहे सैफुल्लाह खालीद?
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून खालिदचे नाव समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे समोर आलेल्या दहशतवाद्याचे नाव लष्कराचा उपप्रमुख खलिद सैफउल्लाह आहे. त्याला सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखले जाते. हा तोच दहशतवादी आहे ज्याचा भारतातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये हात आहे आणि तो हाफिज सईदच्या अगदी जवळचा मानला जातो.
- खालिद सैफुल्लाह हा पाकिस्तानमध्ये राहतो. त्याला लक्झरी लाईफ पाकिस्तानने बहाल केल्याचे बोलले जाते.
- पाकिस्तानातील लष्करी अधिकारीही त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरतात यावरून त्यांचे हितसंबंध पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांशी कसे आहेत याचा अंदाज येतो.
- सैफुल्लाह खालीद नेहमी आलिशान कारमधून प्रवास करतो आणि त्याला सशस्त्र दहशतवाद्यांकडून संरक्षण मिळते.
- पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवण्याचे काम तो करतो.
भारताविरुद्ध दिले जहरी भाषण
रिपोर्टनुसार, हल्ल्याच्या दोन महिन्यांपूर्वी तो पंजाबमधील कंगनपूर, पाकिस्तानमधील पाक लष्कराच्या एका मोठ्या कॅम्पमध्ये गेला होता. तिथे त्यांना स्वतः कर्नल जाहिद झरीन खट्टक यांनी बोलावून तिथे उपस्थित सैनिकांना भारताविरुद्ध जहरी भाषणे दिली होते. हा कार्यक्रम आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या उपस्थितीत झाला, जिथे मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी उपस्थित होते.
असे करत होता लांगूलचालन
आज तकच्या रिपोर्टनुसार, तुम्ही जितके भारतीय सैनिक मारले तितके अल्लाह अधिक बक्षीस देईल. सैफुल्लाहचे म्हणणे आहे की, 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
टीआरएफची निती काय?
द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनाकडे काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिणेसाठी प्रत्येकी एक हँडलर आहे. दक्षिण काश्मीर युनिटचे नियंत्रण सज्जाद जट यांच्याकडे आहे, तर हंझाला अंदनान उत्तर काश्मीर युनिट हाताळते. मध्य काश्मीरसाठी, हँडलर खालिद आहे आणि तिघेही लष्कर-ए-तय्यबाचे प्रमुख आहेत.
द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) 2019 या वर्षी अस्तित्वात आली. असे म्हटले जाते की, टीआरएफला पाकिस्तानकडून आणि आयएसआयकडून निधी दिला जातो.












Click it and Unblock the Notifications