पहलगाम हल्ल्यावर PM मोदी म्हणाले- हल्लेखोरांना सोडणार नाही! पर्यटकांवर कधी आणि कसा झाला हल्ला? वाचा
Jammu and kashmir pahalgam terrorist attack pm modi reaction : पवित्र धाम अमरनाथ यात्रेच्या काही महिने आधी मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बैसरनच्या पर्यटनस्थळी घोडेस्वारी करत असताना दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांवर गोळीबार केला.

प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत 12 जण जखमी झाले आहेत. तर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे, या हल्ल्यात चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
I strongly condemn the terror attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Condolences to those who have lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. All possible assistance is being provided to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2025
Those behind this heinous act will be brought…
पीएम मोदींनी घेतली ऑनलाईन बैठक, अमित शहा घटनास्थळी रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या हल्ल्यानंतर पीएम मोदींशी फोनवर संवाद साधला आहे. दरम्यान पीएम मोदींनी संबंधित अधिकाऱ्यांशी दुरदृष्टप्रणालीद्वारे सौदी अरेबियातून बैठक घेतल्याची माहिती अमित शहा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे. पीएम मोदींशी संवाद साधल्यानंतर अमित शहा हे जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत.
#WATCH | दिल्ली: पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकवादी हमले के मद्देनजर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और जम्मू-कश्मीर के उपराज्यपाल मनोज सिन्हा श्रीनगर के लिए रवाना हुए। pic.twitter.com/fNqYmOFs7X
— ANI_HindiNews (@AHindinews) April 22, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ला हल्ला केव्हा आणि कसा झाला?
पर्यटक आणि स्थानिकांनी गजबजलेल्या पहलगामच्या बैसरन भागात मंगळवारी 22 एप्रिल 2025 दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला झाला. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यात एकाचा मृत्यू झाला आणि तीन पर्यटक आणि तीन स्थानिकांसह 12 जण जखमी झाले.
#WATCH | Srinagar, J&K | Union Home Minister Amit Shah will soon arrive in Srinagar for a high-level meeting in the wake of the terrorist attack on tourists in Pahalgam. Visuals from the city. pic.twitter.com/VwEENxmNGs
— ANI (@ANI) April 22, 2025
कसा झाला पहेलगाममध्ये हल्ला?
जेव्हा घोडेस्वार पर्यटक डोंगराच्या माथ्यावर होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि पर्यटकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. यात पळापळ झाली आणि काहीजण गोळीबारात जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या गणवेशात आले दहशतवादी!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी पोलिस किंवा लष्कराच्या गणवेशात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आधी लोकांना त्यांची नावे आणि धर्म विचारला, नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
'तुम्ही मुस्लिम आहात का?' विचारले अन् गोळी झाडली! - प्रत्यक्षदर्शी
एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, ती तिच्या पतीसोबत रस्त्याच्या कडेला भेळपुरी खात होती, तेव्हा एक सशस्त्र व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि विचारले, "तुम्ही मुस्लिम आहात का?" तो प्रतिसाद देण्यापूर्वीच त्याने महिलेच्या पतीवर गोळी झाडली. बाई रडत म्हणाली - "आम्ही फिरायला आलो होतो... काय झालं?"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
"जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी शोक व्यक्त करतो. या हल्ल्यातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे."
हल्लेखोरांना कायद्याच्या कठड्यात आणू - पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " या घृणास्पद कृत्यामागे असलेल्यांना कायद्याच्या कठड्यात आणले जाईल... त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल."
अमित शहा काय म्हणाले?
पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले? "जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. माझे विचार मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या घृणास्पद दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आम्ही दोषींवर कठोरपणे कठोर कारवाई करु"
Anguished by the terror attack on tourists in Pahalgam, Jammu and Kashmir. My thoughts are with the family members of the deceased. Those involved in this dastardly act of terror will not be spared, and we will come down heavily on the perpetrators with the harshest consequences.…
— Amit Shah (@AmitShah) April 22, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची माहिती घेतली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. सर्व एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी मी श्रीनगरला रवाना झालो आहे."
-
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
अदानी टोटल गॅसकडून CNG आणि घरगुती PNG चे दर स्थिर; काही उद्योगांच्या पुरवठ्यात कपात -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग! -
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा -
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 'एवढ्या' लाखांचे कर्ज माफ होणार! काय स्वस्त काय महाग यादी पहा







Click it and Unblock the Notifications