IPL Mega Auction 2026 : मोठी बातमी! तारीख ठरली! 'या' दिवशी होणार आयपीएल खेळाडूंचे लिलाव!
IPL Mega Auction 2026 Dates Out : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आगामी हंगामासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. IPL Mega Auction अर्थात आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली आहे. हे लिलाव आता वर्षाअखेरीस होणार आहेत. यासंदर्भात 'क्रिकबझ'ने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट केली आहे.

फोटो-संग्रहीत
क्रिकबझनुसार, येत्या १३ ते १५ डिसेंबर दरम्यान आयपीएल लिलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सर्व फ्रँचायझींना आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचे आहे, याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन महिन्यानंतर आयपीएलचे वारे पुन्हा देशात वाहणार आहेत.
🚨 𝐈𝐏𝐋 𝐀𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 to be held around December 13-15. November 15 is set to be the deadline for 𝐫𝐞𝐭𝐞𝐧𝐭𝐢𝐨𝐧𝐬 pic.twitter.com/ljZyewTtU5
— Cricbuzz (@cricbuzz) October 10, 2025
यामुळे सर्व १० संघांमध्ये आता रणनीती आणि बदलांच्या हालचालींना वेग येणार आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी खेळाडूंचे 'रिटेन्शन' करणे ही पहिली आणि सर्वात मोठी प्रक्रिया असेल, ज्यानंतर अनेक मोठे आणि अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा लिलावाच्या रिंगणात उतरताना दिसतील.
लिलावाचे वेळापत्रक (अपेक्षित)
- खेळाडू रिटेन्शन डेडलाईन: १५ नोव्हेंबर २०२५
- मेगा ऑक्शनची तारीख: १३ ते १५ डिसेंबर २०२५ (अपेक्षित)
२०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शननंतर आता अनेक संघात मोठे बदल अपेक्षित आहेत. जुने खेळाडू रिलीज करून नवीन खेळाडूंना संधी देणे, हा या लिलावाचा उद्देश असेल.
IPL च्या गतविजेत्या संघांची माहिती
आयपीएलच्या इतिहासात काही संघांनी आपले मोठे वर्चस्व सिद्ध केले आहे. येथे सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांची माहिती दिली आहे:
| संघ | सर्वाधिक विजेतेपद |
| मुंबई इंडियन्स (MI) | ५ वेळा |
| कोलकाता नाईट रायडर्स (KKR) | ३ वेळा |
| चेन्नई सुपर किंग्ज (CSK) | ५ वेळा |
| राजस्थान रॉयल्स (RR) १ वेळा | १ वेळा |
प्रमुख टीम्स आणि अपेक्षित बदल
- चेन्नई सुपर किंग्ज (CSK): 'थला' महेंद्र सिंग धोनीने (MS Dhoni) निवृत्ती घेतल्यानंतर संघ व्यवस्थापन आपल्या भविष्यातील नेतृत्वासाठी काही तरुण खेळाडूंना 'रिटेन' करेल.
- मुंबई इंडियन्स (MI): रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या मोठ्या नावांपैकी कोणाला 'रिटेन' करायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनासाठी आव्हान ठरू शकतो.
- कोलकाता नाईट रायडर्स (KKR): गतविजेता संघ म्हणून KKR आपले मजबूत संयोजन (Combination) कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
यंदाच्या ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना संधी मिळू शकते, तसेच अनेक युवा खेळाडूंवरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IPL मध्ये राहिला अनसोल्ड, आता पृथ्वी शॉने दाखवला क्लास; 75 धावांची वादळी खेळी












Click it and Unblock the Notifications