Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL मध्ये राहिला अनसोल्ड, आता पृथ्वी शॉने दाखवला क्लास; 75 धावांची वादळी खेळी

टी20 मुंबई लीगमध्ये रविवारी कर्णधार पृथ्वी शॉच्या वादळी खेळीच्या जोरावर नॉर्थ मुंबई पँथर्सने ट्रम्फ नाईट्सचा 38 धावांनी पराभव केला. आयपीएल 2025 साठी कोणत्याही संघाने त्याला निवडले नाही, म्हणजेच तो 'अनसोल्ड' राहिला. पण पृथ्वी शॉने टी20 मुंबई लीगमध्ये धडाकेबाज पुनरागमन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

prithvi shaw comeback

ट्रम्फ नाईट्सविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीस उतरला होता. त्याने केवळ 23 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. एकूण 34 चेंडूंच्या खेळीत त्याने 3 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीमुळे नॉर्थ मुंबई पँथर्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावांची मजबूत धावसंख्या उभारली.

पृथ्वी शॉशिवाय, हर्षल जाधवने 30 चेंडूत 46 धावांची आणि राहुल सावंतने 9 चेंडूत तडाखेबाज 26 धावांची खेळी केली. दुसरीकडे ट्रम्फ नाईट्सकडून श्रेयस गौरवने उत्कृष्ट गोलंदाजी करताना 4 षटकांत केवळ 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

ट्रम्फ नाईट्स 169 धावांवर गारद

नॉर्थ मुंबई पँथर्सने ठेवलेलं 208 धावांचं आव्हान पेलायला उतरलेल्या ट्रम्फ नाईट्सची संपूर्ण टीम 19.5 षटकांत 169 धावांवर गारद झाली. ट्रम्फ नाईट्ससाठी सलामीला आलेल्या सिद्धांत आद्धतरावने एकाकी झुंज देत 45 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे त्याची खेळी अपुरीच ठरली.

कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील काहीसा झणझणीत खेळ करत 16 चेंडूत 29 धावा केल्या, पण त्यालाही फारसा पाठिंबा मिळाला नाही. नॉर्थ मुंबई पँथर्सकडून प्रतीक मिश्रा यांनी प्रभावी गोलंदाजी केली. त्यांनी 3.5 षटकांत 30 धावा देत चार महत्त्वाचे विकेट्स घेतले.

राहुल सावंतनेही गोलंदाजीत चमक दाखवली. त्याने 4 षटकांत 23 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मुज्जमिल कादरी आणि गौरव जाथर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

पृथ्वी शॉच्या या आक्रमक आणि सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळीमुळे त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. खराब फॉर्ममुळे आयपीएलमध्ये दुर्लक्षित झालेला शॉ आता मुंबई लीगमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असून त्याची ही कामगिरी भविष्यातील संधींसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. टी20 लीगमधील या खेळीनं तो पुन्हा चर्चेत आला आहे आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+