Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

T20 World Cup 2026 फायनलमध्ये भारताचा विजय पक्का? किवीविरुद्ध 'हे' 5 शुभ संकेत टीम इंडियाच्या बाजूने

T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून जेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी काही असे रंजक योगायोग आणि सकारात्मक चिन्हे समोर येत आहेत, जे भारताचे पारडे जड असल्याचे दर्शवत आहेत.

India vs new zealand t20 world cup 2026

१. गौतम गंभीरचा 'फायनल'मधील अभेद्य रेकॉर्ड

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा फायनल सामन्यांसाठी 'लकी' मानला जातो. खेळाडू म्हणून त्याने २००७ चा टी-२० आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलमध्येही कर्णधार आणि मेंटॉर म्हणून त्याने कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले आहे. गंभीरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकही फायनल गमावलेली नाही, हा भारतासाठी मोठा मानसिक विजय ठरू शकतो.

२. शिवम दुबे: भारताचा 'लकी चार्म'

शिवम दुबे संघात आल्यापासून भारताने आयसीसी स्पर्धेत एकही पराभव पत्करलेला नाही. जरी क्रिकेटमध्ये अंधश्रद्धेला स्थान नसले, तरी दबावाच्या सामन्यांमध्ये दुबेची उपस्थिती भारतासाठी शुभ मानली जात आहे.

३. 'रिचर्ड केटलबरो' यांचा अडथळा दूर

भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पंच रिचर्ड केटलबरो यावेळी मैदानावरील पंच नसतील. २०१४ टी-२० विश्वचषक फायनल, २०१९ विश्वचषक सेमीफायनल आणि २०२३ विश्वचषक फायनलमध्ये केटलबरो पंच असताना भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्यांची अनुपस्थिती भारतीय चाहत्यांना एक शुभ संकेत वाटत आहे.

४. जुन्या विजयांची पुनरावृत्ती?

२००७ आणि २०११ च्या विश्वचषक मोहिमेत भारताला साखळी फेरीत एका पराभवाचा सामना करावा लागला होता आणि त्यानंतर भारताने ट्रॉफी उचलली होती. चालू स्पर्धेतही भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. याउलट, २०१४ आणि २०२३ मध्ये भारत अजिंक्य राहून फायनलमध्ये पोहोचला होता, पण तिथे पराभव झाला होता. त्यामुळे यावेळचा पॅटर्न भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

५. घरच्या मैदानावर इतिहास रचण्याची संधी

२०११ मध्ये भारताने मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. आता टी-२० फॉरमॅटमध्येही घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनण्याची संधी भारताकडे आहे.

हेही वाचा : IND vs NZ: भारत की न्युझीलंड होणार नवा वर्ल्ड चॅम्पियन? फायनल मॅच फ्रीमध्ये पाहण्याचा 'हे' आहे जुगाड

हेही वाचा : IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+