Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ: भारत की न्युझीलंड होणार नवा वर्ल्ड चॅम्पियन? फायनल मॅच फ्रीमध्ये पाहण्याचा 'हे' आहे जुगाड

IND vs NZ T20 World Cup 2026 final : भारतीय क्रिकेट संघ आज क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्याच्या उंबरठ्यावर आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना बलाढ्य न्यूझीलंडशी होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर तीन वेळा जेतेपद मिळवणारा तो पहिला संघ ठरेलच, शिवाय सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकून आपले जेतेपद राखणारा इतिहासही रचेल.

IND vs NZ T20 World Cup 2026 final

भारतीय खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये (IND vs NZ Final)

भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संपूर्ण प्रवासात संजू सॅमसन 'एक्स-फॅक्टर' ठरला आहे. त्याने सेमीफायनलमध्ये ४२ चेंडूत ८९ धावांची वादळी खेळी केली होती. फलंदाजीमध्ये ईशान किशन (२६३ धावा) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (२४२ धावा) यांनी सातत्य दाखवले आहे.

कीवी संघाचे आव्हान: फिन ॲलन आणि टिम सीफर्ट

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सनी नमवून फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांचा सलामीवीर फिन ॲलनने सेमीफायनलमध्ये अवघ्या ३३ चेंडूत वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. गोलंदाजीत रचिन रवींद्र (११ विकेट्स) हा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

इतिहास बदलण्याचे मोठे आव्हान

टी-20 क्रिकेटच्या एकूण आकडेवारीमध्ये भारत १६-११ ने पुढे असला तरी, टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आतापर्यंत एकदाही न्यूझीलंडला हरवू शकलेला नाही. विश्वचषकाच्या मंचावर आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात कीवी संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर हा जुना विक्रम मोडीत काढण्याचे मोठे आव्हान सूर्याच्या टीम इंडियासमोर असेल.

कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

वेळ: भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता.

टीव्ही: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network).

लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ-हॉटस्टार ॲप आणि वेबसाइट.

फ्री जुगाड: डिश टीव्हीच्या डीडी स्पोर्ट्स (DD Sports) चॅनेलवर हा सामना विनामूल्य प्रसारित केला जाणार आहे.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ महाअंतिम सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघांची संभाव्य 'प्लेइंग इलेव्हन'

अहमदाबादच्या खेळपट्टीवर फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांनाही मदत मिळण्याची शक्यता असल्याने दोन्ही संघ संतुलित संघ मैदानात उतरवतील.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India Probable XI)

भारतीय संघात सध्या सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या फॉर्मबद्दल चर्चा असली तरी, संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास कायम ठेवण्याची शक्यता आहे. मात्र, अनुभवी कुलदीप यादवला वरुण चक्रवर्तीच्या जागी संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • अभिषेक शर्मा
  • संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
  • ईशान किशन
  • सूर्यकुमार यादव (कर्णधार)
  • टिळक वर्मा
  • हार्दिक पंड्या
  • शिवम दुबे
  • अक्षर पटेल
  • वरुण चक्रवर्ती / कुलदीप यादव
  • जसप्रीत बुमराह
  • अर्शदीप सिंह

न्यूझीलंड संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (New Zealand Probable XI)

न्यूझीलंडचा संघ 'विनिंग कॉम्बिनेशन'सह मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे. फिन ॲलन आणि टिम सीफर्ट यांची सलामीची जोडी भारतासाठी सर्वात मोठे आव्हान असेल.

  • फिन ॲलन
  • टिम सीफर्ट (यष्टीरक्षक)
  • रचिन रवींद्र
  • ग्लेन फिलिप्स
  • मार्क चॅपमन
  • डॅरिल मिशेल
  • मिचेल सँटनर (कर्णधार)
  • जेम्स नीशम
  • कोल मॅककोन्की
  • मॅट हेन्री
  • लॉकी फर्ग्युसन

लक्षात घेण्यासारख्या गोष्टी

  • संजू सॅमसनचा फॉर्म: गेल्या दोन सामन्यांत त्याने ८९ आणि ९७ धावांची खेळी केली असून तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
  • फिन ॲलनचा धोका: सेमीफायनलमध्ये ३३ चेंडूत शतक ठोकणारा ॲलन भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

अहमदाबादची खेळपट्टी: येथे सरासरी धावसंख्या १७५-२०० च्या दरम्यान राहते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो (दव फॅक्टरमुळे).

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+