Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-न्यूझीलंडच्या फिरकीपटूंची प्रतिष्ठा पणाला, फायनल सामन्यात दुबईच्या मैदानावर लागणार त्यांचा कस!

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर आज (9 मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भिडणार आहेत.

भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने हरवले होते. दुसऱ्या उपांत्य सामन्यात किवी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला होता.

आता हे दोन्ही संघ एकमेकांना आज रविवारी भिडतील. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात दोन्ही संघातील फिरकीपटू हे गेमचेंजर ठरू शकतात, असा क्रिकेट विश्वातील तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचे कारण म्हणजे मैदानाची खासियत. दुबईत ज्या मैदानावर हा सामना होत आहे, त्या ठिकाणी फिरकीपटूंचा कस लागणार आहे.

Champions Trophy 2025

दुबईच्या मैदानावर फिरकीपटू खेळतील!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ज्या खेळपट्टीवर खेळला गेला होता, तिच खेळपट्टी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही वापरली जाणार आहे. अशा परिस्थितीत, खेळपट्टी संथ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जी निश्चितच फिरकीपटूंना सर्वाधिक मदतीची ठरणार आहे. या सामन्यात जो संघ फिरकी गोलंदाजांना चांगल्या प्रकारे हाताळेल त्याला जिंकणे अधिक सोपे होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हे ही वाचा : Ind Vs NZ Final Match: भारत Vs न्यूझीलंडमध्ये रंगणार थरार, जाणून घ्या संघाचे- Head To Head Record

जेव्हा भारत-न्यूझीलंड गट टप्प्यात याच मैदानावर खेळले. तेव्हा भारतीय फिरकीपटूंनी किवी संघावर कहर केला. भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या 10 पैकी 9 विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव (2 विकेट), अक्षर पटेल (1 विकेट) आणि रवींद्र जडेजा (1 विकेट) यांनाही यश मिळाले. आता न्यूझीलंडचे फलंदाज निश्चितच पूर्ण तयारीने अंतिम फेरीत प्रवेश करतील आणि ते भारतीय फिरकीपटूंविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.

तथापि, किवी फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंचा सामना करणे सोपे जाणार नाही. संपूर्ण स्पर्धेत रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी विरोधी फलंदाजांना गोंधळात टाकले आहे. तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे भारतीय गोलंदाजीचे केंद्रबिंदू आहेत. अक्षर-जडेजा यांनी त्यांच्या अचूकतेने आणि काटकसरीने गोलंदाजी करून फलंदाजांना खूप त्रास दिला आहे.

हे ही वाचा : India vs New Zealand : चॅम्पियन ट्राॅफीत आज महामुकाबला! भारत कि न्युझीलंड कोण जिंकणार? वाचा अंदाज

भारत-पाकिस्तान सामन्यात वापरल्या गेलेल्या खेळपट्टीवर अंतिम सामना खेळला जाणार असल्याने, चारही भारतीय फिरकीपटू न्यूझीलंडविरुद्ध जाळे फिरवू शकतात. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांच्याकडे या चार फिरकीपटूंचा सामना करण्याची सर्वोत्तम क्षमता आहे, जे स्लो बॉलरविरुद्ध सर्वात सक्षम किवी फलंदाजांपैकी एक आहेत.

न्यूझीलंड संघालाही त्यांच्या फिरकीपटूंवर विश्वास

दुसरीकडे, किवी संघाला त्यांच्या फिरकी गोलंदाजांवरही विश्वास आहे. त्यांच्याकडे एक फिरकी चौकडी देखील आहे, ज्यामध्ये कर्णधार मिशेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत किवी फिरकीपटूंनी विनाशकारी कामगिरी केली होती.

अशा परिस्थितीत भारतीय फलंदाज किवी फिरकीपटूंना अजिबात हलके घेणार नाहीत. न्यूझीलंड संघ 2000 नंतरचा पहिला आयसीसी एकदिवसीय विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. योगायोगाने, 25 वर्षांपूर्वी केनियामध्ये झालेल्या नॉकआउट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताला चार विकेट्सने पराभूत केले होते.

हे ही वाचा : IND vs NZ: भारत - न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत दोन ICC फायनल झाले,जाणून घ्या कोणाचा पगडा भारी

...तर न्यूझीलंड 5 स्पिनर्ससह मैदानात उतरेल!

या सामन्यात वेगवान गोलंदाज मॅट हेन्री खेळेल की नाही हे निश्चित नसल्याने न्यूझीलंडचा संघ पाच फिरकीपटूंसह अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. जर हेन्री बाहेर पडला तर किवी संघ त्याच्या जागी प्लेइंग-11 मध्ये मार्क चॅपमनचा समावेश करण्याचा विचार करू शकतो. मार्क चॅपमन हा डावखुरा फलंदाज आहे आणि तो एक उपयुक्त फिरकी गोलंदाज देखील आहे. जर चॅपमन खेळला तर किवी संघाकडे पाच फिरकी पर्याय असतील.

हे ही वाचा : चॅम्पियन ट्राॅफीतील अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार का? शुभमन गिलने सस्पेंस संपवला!

दोन्ही संघाचे संभावित प्लेइंग-11

न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, जेकब डफी, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+