Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs NZ Final Match: भारत Vs न्यूझीलंडमध्ये रंगणार थरार, जाणून घ्या संघाचे- Head To Head Record

Champions Trophy 2025-India vs New Zealand Final- Dubai Stadium : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना रविवारी दि.9 मार्च रोजी दुबई स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी मैदानात मोठ्या ताकदीने उतरणार असून विजेतेपद मिळावे म्हणून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला होणार आहे.

या मेगा इव्हेंटच्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन वेळची चॅम्पियन टीम इंडिया आणि एक वेळची चॅम्पियन न्यूझीलंड यांच्यात एक रोमांचक सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. चला तर जाणून घेऊया या, या महामुकाबला असलेल्या सामन्याविषयी सविस्तरपणे.., दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे होणार आहेत.

Ind vs NZ final

याआाधी भारत कधी जिंकला होता, न्यूझीलंडची स्थिती काय?

याआधी, 2000 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र, या रोमांचक सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध नवीन रणनीती आखेल आणि या स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने 2002 मध्ये (श्रीलंकेसह संयुक्तपणे) आणि 2013 मध्ये विजेतेपद जिंकले होते, तर न्यूझीलंडचा संघ 2000 मध्ये विजेता ठरला होता.

हेड टू हेड रेकॉर्ड कसा? (IND vs NZ Head to Head In ODI)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 1975 मध्ये खेळला गेला होता. आतापर्यंत दोघांमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात, टीम इंडियाने वरचढ कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 61 सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यांमध्ये 1 सामना बरोबरीत सुटला आणि निकाल लागला नाही. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा, दोन्ही संघ दुबई क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील.

गेल्या 10 सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर टीम इंडिया खूप पुढे असल्याचे दिसते. गेल्या 10 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 6 वेळा आणि न्यूझीलंडने 3 वेळा विजय मिळवला आहे, त्यापैकी एक अनिर्णीत राहिला. तथापि, टीम इंडियाने त्यांच्या घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकले.

CT-2025 : टीम इंडिया आणि न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण?

रचिन रवींद्र सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. रचिन रवींद्रने तीन सामन्यांमध्ये एकूण 226 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या आहेत. विराट कोहलीने चार सामन्यांमध्ये 217 धावा केल्या आहेत.

CT-2025 : टीम इंडिया आणि न्यूझीलंडचा सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाज कोण?

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, मोहम्मद शमी हा चार सामन्यांमध्ये 8 विकेट घेऊन टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मिचेल सँटनरने चार सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कधी, कुठे , किती वाजता?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी 9 मार्च 2025 रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याच्या अर्धा तासांपूर्वी म्हणजेच दोन वाजता टॉस होणार आहे.

अंतिम सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर थेट पाहू शकता. हे हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहे.

अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर जाऊन पाहू शकता.

भारत आणि न्यूझीलंड संघातील प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+