Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चॅम्पियन ट्राॅफीतील अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार का? शुभमन गिलने सस्पेंस संपवला!

Rohit Sharma Retirement : भारत आणि न्युझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्राॅफीतील अंतीम सामना आज 9 मार्च 2025 रोजी होणार आहे. दुबई क्रिकेट लँड स्टेडियमवर हा सामना होईल. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा निवृत्त होऊ शकतो, अशी शक्यता होती. मात्र, अंतिम मॅच होण्यापूर्वी भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याने रोहितच्या निवृत्तीबाबत वाढता सस्पेंस संपवला आहे.

शुभमन गिलने रोहितच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलपूर्वी जेव्हा गिल भारताच्या प्री-मॅच पत्रकार परिषदेला पोहोचला तेव्हा त्याला रोहितच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आले, यावर गीलने याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

Shubman Gill ends the suspense over Rohit Sharma retirement

संघाचे लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर..

गिल पुढे म्हणाला की, रोहितच्या निवृत्तीबद्दलच्या विषयांचा फारसा विचार करत नाही. पण शेवटी गिल जे बोलला त्याचे अनेक अर्थ आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅच संपल्यानंतर रोहित निवृत्तीबद्दल अंतिम निर्णय घेऊ शकतो, असेही तो म्हणाला. रोहीतच्या निवृत्तीसंदर्भात संघात काहीही चर्चा मी कुणाकडून ऐकलेली नाही. आमची सगळी चर्चा आणि फोकस आमच्या जिंकण्याबद्दल आहे आणि आम्हाला फक्त हा सामना जिंकायचा आहे.

गिल टीम इंडियाचा पुढील कर्णधार होणार का?

न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमुळे सर्वांचे लक्ष केवळ भारताच्या विजेतेपदावरच नाही तर रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भवितव्यावरही लागले आहे. वयाच्या 24 व्या वर्षी, गिलची भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली आणि भविष्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधार असताना शुभमन गिलची कामगिरी उत्कृष्ट आहे.

रोहीत शर्माला शमा मोहम्मद म्हटली होती जाड्या

काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माची तुलना माजी भारतीय क्रिकेट दिग्गजांशी केली. त्यांनी लिहिले की, 'सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, कपिल देव आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या तुलनेत रोहित शर्मामध्ये इतके जागतिक दर्जाचे काय आहे? तो एक सरासरी खेळाडू आणि कर्णधार आहे, त्याला योगायोगाने भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले. शमा मोहम्मद यांनी रोहीत शर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सोशल मीडियावर लिहिले की, एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे, त्याने वजन कमी केले पाहिजे. शमा मोहम्मद म्हणाल्या की, रहित हा भारताचा सर्वात निराशाजनक कर्णधार आहे.

टीकेनंतर शमा यांनी दिले होते स्पष्टीकरण

टीका झाल्यावर शमा मोहम्मद म्हणाल्या, 'मी कोणाचाही अपमान करण्यासाठी ट्विट केले नाही. त्या ट्विटमध्ये मी म्हटले होते की एक खेळाडू असल्याने त्याचे वजन जास्त आहे. हे बॉडी शेमिंग नाहीये. मी त्याला एक अप्रभावी कर्णधार म्हटले कारण मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+