Champions trophy 2025 AUS vs ENG : उद्या आस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामना; कधी आणि कुठे पाहाल?
Champions trophy 2025 AUS vs ENG : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दुखापतींनी ग्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडशी शनीवारी (22 फेब्रुवारी 2025) रोजी सामना होणार आहे. मुळातः हे दोन्ही संघ पारंपारिक प्रतिस्पर्धी आहे. ॲशेस मालिकेची परंपरा या उभय संघात फार जुनी आहे. ब गटात या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये हा सामना होत आहे.
गट ब मध्ये इंग्लड संघ विजयासाठी आतूर आहे तर दुसरीकडे आस्ट्रेलियन संघही विजय मिळवण्यासाठी कसून तयारी करत आहे. मागील दोन सामन्यात आस्ट्रेलियन संघाची कामगिरी फारशी चांगली राहीलेली नाही यासह संघातील काही खेळाडू दुखापतीने ग्रस्त होते. आता हा संघ सावरला असून हा सामना आस्ट्रेलियासाठी महत्वपूर्ण मानला जात आहे तर दुसरीकडे इंग्लड संघही काही कमी नाही.

15 वर्षात ऑस्ट्रेलियाने एकही सामना जिंकला नाही
आस्ट्रेलियन संघाने 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यानंतर मात्र चॅम्पियन ट्राॅफीत ऑस्ट्रेलियाची कामगिरी सुमार राहीली आहे. या संघाला गेल्या 15 वर्षांत एकही सामना जिंकता आलेला नाही. आस्ट्रेलियन संघाने 2013 आणि 2017 मध्ये सहा सामने खेळले. त्यापैकी तीन वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर उर्वरित सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही.
हेही वाचा : भारत-पाकिस्तान मॅच कोण जिंकणार? IIT बाबांनी अशी भविष्यवाणी केली की लोक संतापले! वाचा काय झालं
AUS vs ENG : तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर
1. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना कधी होणार?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना शनिवारी 22 फेब्रुवारीला होणार आहे.
2. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना कुठे होणार?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
3. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.
4. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतात टीव्हीवर कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामना शनिवारी (22 फेब्रुवारी 2025) रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता JioStar नेटवर्क्सच्या स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रसारणासह सुरू होईल, तर JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.
हेही वाचा : Champion Trophy 2025 : आश्चर्यच.. चॅम्पियन ट्राॅफीत खेळत आहेत 18 भारतीय खेळाडू! 3 पाकिस्तानात खेळणार
AUS vs ENG ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स केरी, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, ॲडम सॅन्गवे, मॅटसेन, मॅटसेन, मॅटसेन झाम्पा. राखीव: कूपर कोनोली.
AUS vs ENG इंग्लंड संघ : फिल सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.












Click it and Unblock the Notifications