बिहार निवडणुकीआधी तहव्वुर राणाला फासावर लटकवतील! मग भाजप फेस्टीव्हल साजरा करेल - संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut claims : 26/11 ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणा याला भारतात प्रत्यार्पण कायद्याखाली आणण्यात आले पण मला भाजपचे धोरण ठीक वाटत नाही , कारण त्याच्यावर खटला भरुन फाशी देण्यासाठी आणले की, फक्त क्रेडिट घेण्यासाठी आणले असा सवाल शिवसेना (युबीटी) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला, यासह राणाला बिहार निवडणुकीवेळी फासावर लटकवतील आणि राणा फेस्टीव्हल भाजप साजरे करेल असा टोला लगावला.
संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तहव्वुर राणा त्याचे प्रत्यार्पण आणि भाजप यासंबंधी आपली मतं व्यक्त केली तसेच भाजपच्या धोरणावर टीकाही केली.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, एक आतंकवादी ज्याचा संबंध पाकिस्तानशी आहे. ज्याने 26/11 ला मुंबईवर हल्ला केला देशावर दहशदवादी हल्ला करण्यात एक मोठी भूमिका त्याची आहे. अशा दहशतवाद्याचा आका त्याला भारतात आणले जात असेल तर त्या गोष्टीचे स्वागत करायला हवे. आपल्या एजन्सीजचे भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील होते.
...तर राणाला क्रेडिटसाठी तर आणले नाही
संजय राऊत म्हणाले, मला भाजपचे धोरण आहे ते ठीक दिसत नाही तहव्वुर राणावर खटला चालवून त्याला फाशीवर लटकवण्यासाठी आणले की फक्त क्रेडिट घेण्यासाठी आणले" असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : तहव्वुर राणाला कसाबप्रमाणे फाशी देता येणार नाही, हे आहे खास कारण
..मग मेहुल चौक्शी, नीरव मोदीला का आणत नाही
भाजपवाले नेहमी म्हणतात, घुसून आणू. घुसून मारु मग मी म्हणतो की, कुलभूषण जाधव यांना ते का घेऊन आले नाही. असो पण नीरव मोदींना घेऊन या.. मेहुल चौक्शीला आणा क्रेडिट कसले घेत आहात, दहशतवाद्यांना आणल्याबद्दल क्रेडिट घ्यायचे असते का, काही गोष्टी तुम्ही सोडून द्यायला हव्या होत्या.
हेही वाचा : Tahawwur Rana : कोण आहे तहव्वुर राणा? भारतात कुठे राहणार देशाचा सर्वात मोठा दुश्मन!
राणा फेस्टीव्हल भाजप साजरा करले - संजय राऊत
संजय राऊत यांनी तहव्वुर राणाच्या फाशीबद्दल एक मोठे विधान केले आहे. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकाआधी या राणाला फासावर लटकवतील आणि संपूर्ण देशात परत राणा फेस्टीव्हल साजरा करेल अशी भाजपची निती असते हेही सांगायला राऊत विसरले नाहीत.
हेही वाचा : महाराष्ट्राचा भाजपचा एक मंत्री पाकिस्तानी क्रिकेटरच्या हाताखाली काम करतोय! संजय राऊतांनी धु-धु धुतलं












Click it and Unblock the Notifications