Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Tahawwur Rana : कोण आहे तहव्वुर राणा? भारतात कुठे राहणार देशाचा सर्वात मोठा दुश्मन!

Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले असून भारतात तो पोहचत आहे. आता त्याच्यावर भारतात खटला चालवण्यात येणार आहे. त्याला ठेवण्यासाठी दिल्ली आणि मुंबईतील एकूण दोन तुरुंगात व्यवस्था केली जात आहे. यूएसकडून विशेष न्यायिक शिफारसींच्या अनुषंगाने अतिरिक्त व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर ही प्रक्रीया केली जात आहे.

आपल्यावरील आरोपासंदर्भात राणाने अमेरिकेतील सर्व कायदेशीर मार्गांचा वापर केला होता, पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्याचे अपील फेटाळले आहे. त्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रीया जलदगतीने फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरु झाली होती. आता तो भारतात येत आहे.

Tahawwur Rana

राणा कुणाच्या कस्टडीत राहणार?

अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर सुरुवातीला राणा काही आठवडे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत राहण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. या ऑपरेशनचे निरीक्षण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले होते.

26/11च्या हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब- याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तत्पुर्वी मुंबई हल्ल्यातील आरोपी चकमकीत त्याचवेळी मारले गेले होते पण कटाचा मास्टरमाईंड तव्वहूर राणा हा जीवंत होता, त्याला अमेरिकेने ताब्यात घेत त्याच्यावर तिथे खटलाही चालला. त्यानंतर त्याला भारताकडे अमेरिकेने सोपवले आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

  • कॅप्टन तहव्वुर हुसेन राणा याचा जन्म 12 जानेवारी 1961 साली झाला. तो एक पाकिस्तानी माजी लष्करी डॉक्टर आहे, ज्यांने पाकिस्तान सैन्यात सेवा बजावली होती.
  • नागरिकत्व मिळाल्यानंतर तो कॅनडाला गेला आणि इमिग्रेशन सेवा व्यवसायी बनला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 21जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आदेशात राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला.
  • 2011 मध्ये, त्याला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला पाठिंबा देण्याबद्दल आणि डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स-पोस्टेनवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.
  • 17 जानेवारी 2013 रोजी त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि भारताने फरार घोषित केलेल्या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यापारी तहव्वुर राणा यांचा जामीन अर्ज अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावला होता, आता तो भारतात येत आहे.

राणाचे अपील फेटाळले अन् मार्ग मोकळा

26/11 आरोपी तहव्वूर राणाने भारताकडे प्रत्यार्पणाविरुद्ध सरन्यायाधीश रॉबर्ट्सकडे फेब्रुवारीमध्ये अपील केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या भारतात प्रत्यार्पणाची पुष्टी केली. 21 जानेवारी रोजी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती, ज्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. प्रत्यार्पणासाठी भारत अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत काम करत होते.

प्रत्यार्पण करारानुसार राणा भारतात

15 ऑगस्ट 2024 रोजी अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूरला भारतात पाठवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात राणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राणा या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यावसायिकाने गेल्या वर्षी फेडरल कोर्ट नाइनथ सर्किटमध्ये याचिका दाखल केली होती.

राणा - हेडलीने रचला मुंबई हल्ल्याचा कट

अमेरिकेच्या न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, राणा हा मुंबई हल्ल्यामागील सूत्रधार, आयएसआय अधिकारी मेजर इक्बालचा जवळचा सहकारी होता. राणा आणि हेडली यांनी मिळून प्राणघातक हल्ल्यांचा पाया घातला. एका पोलिस अहवालात असे म्हटले आहे की, राणाने 11 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान भारताच्या भेटीदरम्यान पवईतील रेनेसान्स हॉटेलमध्ये रेकी केली. तो निघून गेल्यानंतर पाच दिवसांनी मुंबईत हल्ले झाले.

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या दस्तऐवजात राणा आणि हेडलीला 2009 मध्ये एफबीआयने डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याचा कट रचताना आणि 2005 ते 2009 या काळात लष्कराला साहित्यिक सहाय्य कसे केले याचा तपशील दिला आहे. अमेरिकेच्या न्यायालयात दिलेल्या साक्षीत हेडलीने सांगितले की 2006 च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याने आणि दोन लष्करांनी मुंबईत त्याच्या समोरील कार्यालयाची स्थापना करण्यासाठी चर्चा केली. नंतर त्यानी शिकागोला प्रवास केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+