"ही सुरुवात आहे" राज-उद्धव ठाकरेंचे दुसरे एकत्र निवेदन; काय म्हणाले वाचा, दोन्ही पक्षांचे नेते एकत्र
Raj Thackeray and Uddhav Thackeray's second joint invitation : शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्ती आणि त्रिभाषा धोरणाला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यानिमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी जोरदार विरोध केला. यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार एक पाऊल मागे आले आणि त्यांनी त्रिभाषा धोरणाबाबतचा शासन निर्णय मागे घेतला. याविरोधात नियोजित मोर्चाऐवजी आता पाच जुलैला ठाकरे बंधुंचा विजयी मेळावा होणार आहे.
या विजयी मेळाव्यासाठी वाजत गाजत या आम्ही फक्त आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुमचाच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकत्रित निमंत्रण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी काल दिले होते. त्यानंतर आज ठाकरे बंधुंनी दुसरे एकत्रित निमंत्रण दिले आहे.

ठाकरे बंधुंचे दुसरे निमंत्रण काय आहे?
एका जाहीर झालेल्या पोस्टवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकत्रित नावे आहेत. ठाकरे बंधुंनी पाच जुलैला मुंबईत एकत्र विजयी मेळाव्याचे आवाहन केले होते. त्यावर दुसऱ्या निमंत्रणात "महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे? मग ही सुरुवात आहे! " असे या जाहीर खुल्या निमंत्रणात म्हटले आहे.
दरम्यान, वरळीतील एनएससीआय येथे कार्यक्रमस्थळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, आशिष चेंबुरकर, सुनील शिंदे, तर मनसेकडून बाळा नांदगावर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांनी आले होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्रित पोस्ट काय?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पाच जुलैला मुंबईतील मेळाव्याला वाजत-गाजत या असे म्हटले आहे, यासह खाली राज-उद्धव ठाकरे असे दोघांचे एकत्रित आवाहन छापलेले आहे.
आवाज मराठी माणसाचा pic.twitter.com/BfQ05RD65l
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 1, 2025
" आवाज मराठीचा !"
"मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं...!
कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं !
आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.
त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा,
आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे.
वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय...!"
आपले नम्र
"राज ठाकरे - उद्धव ठाकरे"
मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंची पोस्ट काय?
विजय मराठी माणसाचा, विजय मराठी भाषेचा! pic.twitter.com/na5luq4hdS
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 29, 2025
उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्याबद्दल एक पोस्ट चर्चेत आहे, त्यात म्हटले की...
"विजय मराठी माणसाचा, विजय मराठी भाषेचा!
मराठी माणूस एकवटताना दिसताच
भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !
ही तर फक्त सुरुवात आहे! एकीचं बळ महाराष्ट्र पाहणार आहे!
हेही वाचा : राज-उद्धव ठाकरे एकत्र लढू शकतात महापालिका निवडणुका! कुणाला होणार जास्त फायदा? जाणून घ्या
हेही वाचा : हिंदी राष्ट्रभाषा नाही अन् तो सक्तीचा विषयही नाही! राज ठाकरे काय म्हणाले? 10 मुद्द्यात जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications