"धुल चेहरेपर थी और वो आईना साफ करता रहा" EVM वरुन CM फडणवीसांची फटकेबाजी, विरोधकांवर हल्ला
Nagpur Winter Session 2024 : "धुल चेहरेपर थी और वो आईना साफ करत रहा..." असे वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इव्हीएमवरुन विरोधकांचा जोरदार समाचार आज विधानसभेत घेतला. " इव्हीएम.. इव्हीएम करु नका. पराभवाचे आत्मपरिक्षण करा. जोपर्यंत तुम्ही हा जनादेश स्वीकारणार नाहीतोपर्यंत तुमची अशीच परिस्थिती होईल असा सल्लावजा इशाराही त्यांनी विरोधकांना आज दिला.
विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बोलत होते. विरोधकांकडून महायुती इव्हीएममुळे विजयी झाल्याचा ठपका ठेवला जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रत्युत्तर आज विधानसभेत भाषणादरम्यान दिले.

नेमकं काय म्हणाले सीएम फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हल्ली इव्हीएम..इव्हीएम रोजच सुरु आहे. त्यासंदर्भात मला थोडासा इतिहास सांगितला पाहिजे. 10 ऑगस्ट 1980 रोजी इव्हीएमचे पहिले सादरीकरण झाले. 19 मे 1982 मध्ये निवडणुकीत इव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला. 1998 आणि 1999 ला वापर झाला. 2004 मध्ये देशातील सर्व लोकसभेत त्याचा वापर झाला. तेव्हा अटलजींचे सरकार जाऊन मनमोहनसिंग यांचे सरकार आले. 2009 मध्यही इव्हीएमचा वापर झाला तेव्हाही काँग्रेस आघाडीचे सरकार आले.
हेही वाचा : Nagpur Winter Session 2024 :अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांनी माफी मागावी - नाना पटोले
अनेक याचिका फेटाळल्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेव्हा 2014 मध्ये मोदींजींचे सरकार आले तेव्हा इव्हीएमविरोधात राळ उठवली गेली. नरेटीव्ह आपण सेट करत आहात. आपल्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आले की, उत्तम आणि विरोधात निकाल आला की, सर्वोच्च न्यायालयावरही टीका केली जाते. इव्हीएमविरोधात दरवर्षी याचिका निकाली निघत आहेत. २०२३ मध्ये दोन तासात याचिका निकाली निघाली कारण त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मोठा निर्णय दिला होता.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा म्हणाले- एकाही पात्र बहिणीना येणारे पैसे बंद होणार नाही
एकही व्यक्ती निवडणूक आयोगात गेला नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले की, ज्यांना वाटते की, इव्हीएम टॅम्पर होऊ शकते तर टॅम्पर करुन टाकले. आठ दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही. जे आरोप केले गेले त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी एकाजवळही तंत्रज्ञान नव्हते आणि एकही व्यक्ती गेला नाही.
हेही वाचा : प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड! CM फडणवीसांनी मानले विरोधी सदस्यांचे आभार
आम्ही पराभव स्वीकारुन आत्मपरिक्षण केले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी विनंती आहे की, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही जनतेचा जनादेश स्वीकारणार नाही, जोपर्यंत तुम्ही आत्मपरिक्षण करणार नाही. तोपर्यंत तुमची हिच परिस्थिती होत राहील. पराभव आमच्याही वाट्याला आला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जेव्हा आम्हाला कमी जागा आल्या, आमच्या पक्षाचा पराभव झाला तेव्हा आम्ही आत्मपरिक्षण केले.
धुल चेहरेपर थी और वो आईना साफ करत रहा...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात हरलो. त्यावेळी आम्ही नाही म्हटलो की, इव्हीएमने आम्हाला हरवले. आम्ही फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर देऊ असेत म्हटले. आम्ही मेहनत केली म्हणून मी जो गालीबने सल्ला दिला तो तुम्हाला (विरोधकांना) देऊ इच्छीतो की, गालीब ता उम्र ये भूल करता रहा..धूल चेहरेपर थी और आईना साफ करता रहा.. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची धुळ साफ
करणार नाही फक्त आरसा पुसत राहाल तर असेच होईल.
देशभक्त वकील तरी आणा..
देवेंद्र फडणवीस म्हणाले, इव्हीएम हटाव रॅली केली, त्या रॅलीत प्रमुख वक्ते कोण तर अॅड. महेमूद प्राचा हे होते. जर्मन बेकरी स्फोटातील मिर्झा हिमायत बेगचा वकील, इस्त्रायल दुतावासात आरोप लागलेल्या मो. मन्सूर अजगर याचा वकील आणि दिल्ली स्फोटातील आरोपीचा वकील आणि नाॅन इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे अशा व्यक्तीचा वकील आहे. लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे की, मी पुराव्यासह सांगितले तरी तुम्ही इव्हीएम विरोध करणार आहे पण जरा देशभक्त वकील तरी आणा.आचा-प्राजापासून दूर राहा.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications