लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा म्हणाले- एकाही पात्र बहिणीना येणारे पैसे बंद होणार नाही
Nagpur Winter Session 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात 1400 कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली.
लाडक्या बहिणींना काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात 1400 कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे.

89 लाख कुटुंबांना वर्षातून मोफत तीन सिलेंडर
एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरु केली. 89 लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देतोय. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत 34 हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झाला.
प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड! CM फडणवीसांनी मानले विरोधी सदस्यांचे आभार
मुख्यमंत्री वयोश्री योजना, 123 कोटींचे अनुदान वाटप
ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून 123 कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर 9 शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. 6 हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.
हेही वाचा : अजित पवारांचे भाजपसोबत अजूनही वैचारीक अंतर; रेशिमबागेत घडले असे काही...
तिप्पट वेगाने विकास करु
महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
हेही वाचा : एकनाथ शिंदे शरद पवारांना थेट भिडले; म्हणाले, गिरेंगे तो टांग उपर...
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केलं. गेल्या अडीच वर्षात विक्रमी कामं झाली. एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.












Click it and Unblock the Notifications