प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड! CM फडणवीसांनी मानले विरोधी सदस्यांचे आभार
Ram Shinde elected unopposed as Chairman of Legislative Council : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज गुरुवारी 19 डिसेंबरला निवडणूक होती पण त्यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. दरम्यान, सभापती प्रा.राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून पदभार सोपविला.
सीएम फडणवीसांनी मानले विरोधी पक्षांच्या सदस्यांचे आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रा. राम शिंदे यांची सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्याबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण सुरु केले. यावेळी त्यांनी प्रा. राम शिंदेंचे कौतूक करत त्यांच्या कार्याबद्दल सभागृहाला माहिती दिली.

2 वर्षांपासून होते विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त
मागील 2 वर्षांपासून विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त होते. नीलम गोर्हे या उपसभापति होत्या. त्यांनीच या काळात विधानपरिषदेचं कामकाज पाहीले. दरम्यान विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे आल्यानंतर भाजपने प्रा. राम शिंदेंना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांची निवडही या पदावर झाल आहे, म्हणजे त्यांच्या रुपाने दोन वर्षानंतर महाराष्ट्र विधान परिषदेला सभापदीपद मिळाले.
लाडक्या बहिणींचा महायुतीला मोठा पाठिंबा! आता 2100 रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंचे मोठे विधान
पंतप्रधान मोदींसह फडणवीसांचे मानले आभार
प्रा. राम शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे. यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींचे आभार मानले आहे. यानंतर त्यांनी काल सकाळी विधान भवन नागपूर येथे त्यांनी अर्ज भरला आणि आज त्यांची सभापती म्हणून निवडही झाली.
विधानपरिषद सभापती निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदेंना उमेदवारी, उद्या अर्ज भरणार, 19 डिसेंबरला निवडणूक












Click it and Unblock the Notifications