विधानपरिषद सभापती निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदेंना उमेदवारी, उद्या अर्ज भरणार, 19 डिसेंबरला निवडणूक
Maharashtra Legislative Council Speaker Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला गुरुवारी होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आता या पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे आभारही मानले आहेत.

2 वर्षांपासून विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त
मागील 2 वर्षांपासून विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त आहे. नीलम गोर्हे या उपसभापती आहेत. त्याच सध्या विधानपरिषदेचं काम पाहत आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पद भाजपकडे असल्याने आता विधानपरिषद शिवसेना आपल्याकडे ठेवत गोर्हेंना प्रमोशन देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
" महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक "
— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) December 17, 2024
माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब,
राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ,
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब ,
त्याचबरोबर देशाचे…
काय आहे प्रा. राम शिंदे यांची पोस्ट?
प्रा. राम शिंदे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे. यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींचे आभार मानले आहे. यानंतर त्यांनी आपल्या पेस्टमध्ये उद्या सकाळी विधान भवन नागपूर येथे दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications