Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nagpur News :.. तर नागपुरात पुरस्थिती! अतिवृष्टीची शक्यता, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Nagpur News : विदर्भात सध्या पावसाचे ढग असून बऱ्याच भागात सध्या पाऊस पडत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही रस्त्यांवरही परिणाम झाला आहे. त्यातच नागपुर जिल्ह्यात आज ९ जुलै रोजी येलो अलर्ट दण्यात आला आहे. यादरम्यान मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. या धर्तीवर शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.

Nagpur News Heavy to very heavy rains likely in District

नागपुरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर जिल्ह्यात दिनांक ८ जुलै २०२५ रोजी ऑरेज
अनर्टे दिनांक ९ जुलै २०२५ रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपुर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

.. तर नागपुरात पुरस्थिती

नागपुर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार जर अतिमुसळधार पाऊस पडल्यास दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी नागपुर जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुर जिल्ह्यातील अनेक
तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.

सीएम देवेंद्र फडणवीसांकडून आढावा

नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर

नागपुर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.या सर्व बाबी विचारात घेता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थांना ९ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर कोचिंग कोचिंग क्लासेसलाही आदेशात सुट्टी जाहीर केली आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून विदर्भातील वरील जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

हेही वाचा : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कसा पाऊस पडेल जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+