विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कसा पाऊस पडेल जाणून घ्या
Maharashtra Rain : राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे, आज 9 जुलै रोजी कोकण गोवा विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वारे वाहू शकतात. तर नागपुरात अतीवृष्टी होऊ शकते येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मराठवाडा
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहतील.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून विदर्भातील वरील जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
पालघर, रायगड, रत्नागिरी घाट विभाग, पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्याचा घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात ऑरेंज अलर्ट
आज ९ जुलै रोजी रायगड चंद्रपूर पुणे व नाशिक जिल्ह्याचा घाट विभागात ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. रायगड वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांना कोल्हापूर साताऱ्याचा घाट विभाग या सुरळ ठिकाणी मुसळधार तर भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यात सुरळ ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यात आज होणार हलका ते मध्यम पाऊस
नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी पडण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी जिंतूर ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडात ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्या ह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील जिल्ह्यांना देण्यात येत आहे.
पुण्यात कसे राहील हवामान?
पुणे व परिसरात आज व उद्या आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सुची स्थिती काय आहे?
पश्चिम बंगाल व लगतच्या क्षेत्रावरील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे, समुद्र स्तरावर असलेला मान्सूनचा ट्रॅक बिकानेर, कानपूर घाटंगास पश्चिम बंगाल आणि आसपासच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रातून जात आहे. त्यानंतर पूर्व दक्षिण पूर्व दिशेने पूर्व समुद्र किनाऱ्याकडे मार्गक्रमण करत आहे. वाऱ्याची ध्व्रुवीय रेषा ईशान्य अरबी समुद्र ते गंगटोक वेस्ट बंगालच्या असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत असून ते दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ दक्षिण छत्तीसगड दक्षिण ओडिसाच्या 4.5 किलोमीटर ते 7.7 किलोमीटर उंचीवर आहे.
हेही वाचा : Nagpur News :.. तर नागपुरात पुरस्थिती! अतिवृष्टीची शक्यता, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर












Click it and Unblock the Notifications