Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ब्रेकिंग न्यूज: पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटर; पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू

Rohit Arya encounter Mumbai : मुंबईतील पवईमध्ये एका स्टुडिओमध्ये 20 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. छातीत डाव्या बाजुला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचा मृतदेह सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आला.

powai rohit arya encounter killed by police

गोळीबारात रोहित झाला होता जखमी

मुंबईतील पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी १:४५ वाजता युट्यूबर रोहित आर्यने १७ मुले, एका ज्येष्ठ नागरिक आणि एका नागरिकाला ओलीस ठेवले होते.

पोलिस आणि विशेष कमांडोंनी त्याला गोळ्या घालून सर्व ओलीसांना सुरक्षितपणे वाचवले. या गोळीबारात आरोपी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांची ही कारवाई एक तास चालली. घटनास्थळावरून एअर गन आणि रसायने जप्त करण्यात आली.

तथापि, आरोपी रोहित आर्यचा हेतू अद्याप अज्ञात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने १०० हून अधिक मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावले होते.

रा स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग आयोजित केले जातात, जिथे मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. घटनेदरम्यान, मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. मुलांचे पालकही आले आहेत.

हे ही वाचा : मुंबई हादरली! पवईत 20-22 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी ताब्यात, नेमक्या मागण्या काय होत्या?

बाथरूममधून एन्ट्री करून मुलांची सुटका

पवई पोलिसांनी कारवाईची माहिती देताना सांगितले की, दुपारी पावणे दोन वाजता एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवल्याचा पवई पोलिस ठाण्यात कॉल आला होता. या कॉलला तात्काळ प्रतिसाद देत विशेष पथकांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

आमच्या स्पेशल पथकाने मुलांना बंधक बनवण्याऱ्या व्यक्तीशी प्राथमिक बोलणे सुद्धा केले. या नंतर आमच्या पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने या इमारतीच्या बाथरूममधून फोर्स एंट्री करून आतील एका नागरिकाच्या मदतीने सर्व मुलांची सुखरूपणे सुटका केली आहे. यात एकूण 17 मुले, एक वृद्ध माणूस आणि एक नागरिक होते.

वेब सिरीज ऑडिशनच्या बहाण्याने बोलावले

आरोपीकडे बंदूक आढळून आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रोहित आर्या असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या नक्की मागण्या काय होत्या याचा आम्ही तपास करत आहोत. तसेच एका वेब सिरिजच्या ऑडिशनसाठी या ठिकाणी काही मुले बोलावण्यात आली होती आणि याच मुलांना बंधक बनवून ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोण होता रोहित आर्य?

मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यकडे एक एअरगन सापडली होती. तो पुण्याचा रहिवासी असल्याचेही समोर आले आहे. दीपक केसरकर मंत्री असताना शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी त्याला टेंडर मिळाले होते. पण त्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्यने केला. केसरकर मंत्री असताना रोहित आर्यने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते, अशीही माहिती समोर येत आहे.

आरोपी रोहित व्हिडिओत काय म्हणाला?

रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, "मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी, मी एक योजना आखली आहे आणि येथे काही मुलांना ओलीस ठेवत आहे. माझ्या फारशा मागण्या नाहीत. माझ्या खूप साध्या मागण्या आहेत, नैतिक मागण्या आहेत आणि काही प्रश्न आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि जर त्यांच्या उत्तरांच्या उत्तरात मला काही प्रश्न असतील तर मी त्यांनाही विचारू इच्छितो, पण मला ही उत्तरे हवी आहेत."

"मला दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, मी जास्त पैसे मागत नाही आणि मी कोणतीही अनैतिक मागणी करत नाही. मी एका योजनेचा भाग म्हणून मुलांना ओलीस ठेवले आहे. जर मला थोडीशीही चिथावणी दिली तर मी या जागेला (स्टुडिओला) आग लावीन. आत्महत्या करण्याऐवजी मी ही योजना आखली आहे. मला चिथावू नका, नाहीतर मी मुलांना हानी पोहोचवणारी पावले उचलेन."

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+