मुंबई हादरली! पवईत 20-22 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी कोण? त्याच्या नेमक्या मागण्या काय होत्या?
powai kidnapping case, Who is rohit arya : राजधानी मुंबईतील पवई परिसरात एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरए स्टुडिओ असलेल्या महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने तब्बल २० ते २२ लहान मुलांना ओलीस (बंधक) ठेवले होते. ही सर्व मुले १५ वर्षांखालील होती आणि गेल्या पाच दिवसांपासून शूटिंग ऑडिशनसाठी येथे येत होती. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबले!
सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना विविध कोर्सेस किंवा ॲक्टिव्हिटीसाठी गुंतवून ठेवत आहेत. पवई येथील याच स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या ४-५ दिवसांपासून प्रशिक्षणासाठी येत होती.
घडले काय?
दुपारी २ वाजताच्या सुमारास मुलांना जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर आरोपी रोहित आर्य याने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले. या धक्कादायक घटनेमुळे मुलांच्या पालकांमध्ये आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनसजी (NSG) कमांडो, आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई के RA स्टूडियो में करीब बच्चों को बंधक बनाया गया.
— Rinku Vishwakarma (@RinkuVishw97844) October 30, 2025
बंधक बनाने वाला आरोपी रोहित आर्या स्टूडियो में काम करता है. इन बच्चों को ऑडिशन के नाम पर बुलाया गया था. #mumbaipolic pic.twitter.com/XWf9n1ibzp
व्हिडिओतून आरोपीचा संवाद आणि मागण्या!
रोहित आर्य याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याने स्पष्ट केले की, तो दहशतवादी नाही आणि त्याची पैशाची मागणी नाही.
रोहित आर्य काय म्हणाला?
माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे. मला संवाद साधायचा आहे, काही लोकांशी बोलायचं आहे आणि त्यांना प्रश्न विचारायचे आहेत."
आर्थिक नुकसान हेच कारण
तपासात अशी माहिती समोर आली आहे की, रोहित आर्य याने एका प्रकल्पात झालेल्या आर्थिक नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केले. रोहित आर्यने शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता. या प्रोजेक्टचे पैसे सरकारकडून त्याला मिळाले नाहीत आणि त्याचे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी, १ मे पासून त्याने साधे उपोषण करूनही दाद मिळाली नव्हती, त्यामुळे त्याने आजपासून तीव्र उपोषण सुरू केले होते.
पोलिसांचे 'बाथरूम एन्ट्री' ऑपरेशन!
पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांना कॉल आला आणि त्यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी त्वरित स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स बोलवली. त्यांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पवई पोलीस अधिकाऱ्यांनी बाथरूममधून आतमध्ये एन्ट्री केली आणि आतील एका व्यक्तीच्या मदतीने सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. एकूण १७ मुले, एक वयस्क आणि एक स्थानिक असे १९ लोक आतमध्ये होते. पोलिसांनी रोहित आर्यला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडे एक बंदूक होती, पण ती कशी आतमध्ये पोहोचली याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपी बंदूक घेऊन आतमध्ये बसला होता. पोलिसांनी वेळेत ऑपरेशन राबवत सर्वांना वाचवले, पण सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सर्व मुले सुखरूप, पालकांमध्ये भीती
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आरोपी माथेफिरू रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेने राजधानी मुंबईत मोठी खळबळ उडाली होती. सुदैवाने, सर्व मुले सुखरूप आहेत, मात्र घटनेमुळे मुले खूप घाबरलेली आहेत, असे पालकांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम!
पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून पोलिसांनी आरए स्टुडिओमध्ये बाथरूममधून प्रवेश करत रोहित आर्य या व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी 17 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून यात एक वृद्ध नागरिक तसेच एका नागरिकाला बाहेर काढण्यात यश आले आहे.
पावणे दोन वाजता कॉल आला...
पवई पोलिसांनी कारवाईची माहिती देताना सांगितले की, पावणे दोन वाजता पवई पोलिस ठाण्यात एक कॉल अल होता, ज्यात एका व्यक्तीने माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवले आहे. या कॉलला आमच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि विशेष पथकांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
बाथरुममधून फोर्सची एंट्री!
आमच्या स्पेशल पथकाने ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवले होते त्यांच्याशी प्राथमिक बोलणे सुद्धा केले. या नंतर आमच्या पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने या इमारतीच्या बाथरूममधून फोर्स एंट्री करून आतील एका नांगरिकाच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूपणे सुटका केली आहे. यात एकूण 17 मुलं, एक वृद्ध माणूस आणि एक नागरिक होते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बंधकाकडे आढळून आली बंदूक
पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, ज्या व्यक्तीने बंधक बनवले होते त्याच्याकडे एक बंदूक आढळून आली आहे. परंतु, अजूनही घटनास्थळी तपास सुरू आहे. या तपासानंतरच आणखी माहिती समोर येऊ शकते.
हा व्यक्ती कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा आम्ही तपास करणार आहोत. रोहित आर्या असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या नक्की मागण्या काय होत्या याचा आम्ही तपास करत आहोत.
तसेच एका वेब सिरिजच्या ऑडिशनसाठी या ठिकाणी काही मुले बोलावण्यात आली होती आणि याच मुलांना बंधक बनवून ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications