चक्क ट्रॉलीच्या स्टिकरखाली लपवले सोने! 21 लाखांचे गोल्ड बार, 76 लाखांची रोकड मुंबई विमानतळावर जप्त
Mumbai News : सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, अशातच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक अनेकजण करत आहेत, तर सोन्याची तस्करी वाढल्याच्या घटनाही समोर येत आहेत. मुंबई विमानतळावर अनेक तस्कर कस्टमच्या जाळ्यात सोने तस्करी करताना अडकले आहेत. अशातच दोन दिवसांत कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर सोने तस्करीसंदर्भात जोरदार कारवाई केली आहे.
सोने तस्करी करणाऱ्या एकाला कस्टमने अटक केली असून 20 आणि 21 मे रोजी केलेल्या कारवाईत जवळपास 21.96 लाख रुपये किमतीचे 0.247 किलो सोने आणि सुमारे 76 लाखांचे परकीय रोकड जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात कस्टम विभागाने एक प्रेसनोट जारी केली आहे.

कधी आणि कुठे केली कारवाई?
20 आणि 21 मे, 2025 रोजी रात्रीच्या ड्युटी दरम्यान, मुंबई विमानतळ आयुक्तालय, झोन-3 येथील अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात 21.96 लाख रुपये किमतीचे 0.247 किलो वजनाचे सोने आणि एका प्रकरणात 76.23 लाख रुपयांच्या समतुल्य परकीय चलन जप्त केले. एका प्रवाशाला अटक करण्यात आली. या प्रकरणी संशयित प्रवाशाची कसून चौकशी सुरु आहे.
हेही वाचा : Pune Crime : रात्रपाळीला जात असलेल्या महिलेवर नराधमाची वक्रदृष्टी, निर्जनस्थळी नेऊन केला अत्याचार
ट्राॅलीच्या जाहीरातीच्या स्टीकरखाली सोन्याचे बार!
प्रोफाइलिंगच्या आधारे, कस्टम अधिकाऱ्यांनी बहरीन आणि दमण येथून येणाऱ्या दोन प्रवाशांना रोखले आणि 247 ग्रॅम निव्वळ वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे बार जप्त केले, ज्याची किंमत 21.96 लाख रुपये आहे. सामानाच्या ट्रॉलीच्या जाहिरातीच्या स्टिकरखाली हे सोने लपवण्यात आले होते.
हेही वाचा : Nagpur Crime: पती म्हणावं की हैवान; हातपाय बांधून डॉक्टर पत्नीच्या डोक्यात घातला रॉड, एका संशयाने...
90 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त
प्रोफाइलिंगच्या आधारे, कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबईहून बँकॉकला निघालेल्या एका प्रवाशांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 90 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 76.23 लाख भारतीय रुपयांच्या समतुल्य परकीय चलन जप्त केले. हे चलन प्रवाशाने बाळगलेल्या हँडबॅगमध्ये लपवून ठेवले होते. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत एका प्रवाशाला अटक करण्यात आल्याचे कस्टमने जारी केलेल्या माहितीत नमूद आहे.
हेही वाचा : मोठा खुलासा! भारतीय शस्त्रं कुठं तैनात होती; चीननं पाकिस्तानला सांगितलं! कशी केली पाकड्याची मदत वाचा
हेही वाचा : फायद्याची गोष्ट! मुंबई उपनरातील प्रवास जलद होणार! Metro 9, फेज-1ची चाचणी पुर्ण, कसा आहे प्रकल्प वाचा












Click it and Unblock the Notifications