फायद्याची गोष्ट! मुंबई उपनरातील प्रवास जलद होणार! Metro 9, फेज-1ची चाचणी पुर्ण, कसा आहे प्रकल्प वाचा
Mumbai Metro 9 Phase 1 : मीरा भाईंदरकरांचा प्रवास आता सुसाट होणार आहे; मुंबई मेट्रो-9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) या तांत्रिक चाचणीचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंतच्या मुंबई मेट्रो मार्ग-९ च्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीला' हिरवा झेंडा दाखवला.
🚇 Metro Route-9 Moves Closer to Completion !
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 14, 2025
CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Ajit Pawar travelled aboard the Metro as they flag off the trial run of Phase-1 of Mumbai Metro Route-9, from Kashigaon to Dahisar (East)' of the Mumbai Metropolitan Region Development… pic.twitter.com/ghiHHtFNZ3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'काशीगाव ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग-9, टप्पा-1 चे तांत्रिक निरीक्षणही केले.
🚇 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व)' मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक व इतर… pic.twitter.com/dq6tO57dGD
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 14, 2025
मिरा भाईंदरकरांचा प्रवास सुसाट होणार
दहिसर मिरा भाईंदर मेट्रो-9 या 13.6 मार्गातील पहिला टप्पा दहिसर-काशीगाव हा आहे. या 4.5 किलोमीटर मार्गावर मेट्रो गाड्यांची चाचणी घेण्यात आली.
या मेट्रो मार्गात एकूण 8 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 4 स्थानके आहेत. यामध्ये दहिसर पूर्व, पांडूरंगवाडी, मिरागाव, काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो मार्ग-9 वरील काशीगाव ते दहिसर (पूर्व) मेट्रोची तांत्रिक चाचणीपूर्वी' मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची पाहणी केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.@Dev_Fadnavis… pic.twitter.com/kOLVSwB7Z3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 14, 2025
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
काशीगाव ते दहिसर (पूर्व) या मेट्रो मार्ग-9, फेज-1 ची तांत्रिक चाचणी आज सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. यशस्वी चाचणीनंतर, ही सुविधा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होईल. या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीमुळे, मुंबई आणि ठाण्यात नियमितपणे प्रवास करणाऱ्या लोकांना अखंड कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळेल.
🕧 12.22pm | 14-5-2025📍Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/Fs4qglL2cu
2027 च्या शेवटी कामे पुर्ण होणार
मुंबई मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी आज पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, मेट्रो 9 मुळे मुंबईहून उपनगरात येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गामुळे मोठी वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच हे काम आम्ही वेगाने करणार आहोत. त्यामुळे 2027 च्या शेवटी ही कामे होतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आता उपनगरांमधील प्रवास जलद होणार
- मेट्रो लाईन 9 ही दहिसर ते मिरा भाईंदर दरम्यानची खास मेट्रो लाईन आहे.
- ही मेट्रो लाईन मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरांना जोडते. ही लाईन मेट्रो लाईन 7 ची विस्तारक आहे.
- मेट्रो लाईन 9 मुळे मुंबई उपनगरातील प्रवास जलद आणि मेट्रोमुळे सुखकर होणार आहे.
- लाईनचा मार्ग दहिसर पुर्वपासून मिरा भाईंदर मार्गे सुभाषचंद्र बोस स्टेडीयमपर्यंत आहे.
'ही' आहेत मेट्रो लाईनदरम्यानची स्थानके
पहिल्या टप्प्यातील 4 स्थानके
- दहिसर (पूर्व)
- पांडुरंग वाडी
- मिरगाव
- काशी गाव
दुसऱ्या टप्प्यातील 4 स्थानके
- साई बाबा नगर
- मेडितिया नगर
- शहीद भगतसिंग गार्डन
- सुभाषचंद्र बोस स्टेडियम












Click it and Unblock the Notifications