Pune Crime : रात्रपाळीला जात असलेल्या महिलेवर नराधमाची वक्रदृष्टी, निर्जनस्थळी नेऊन केला अत्याचार
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून आणखी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमआयडीसीमध्ये कामाला जात असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्काराची घटना घडली. तिला बळजबरी निर्जनस्थळी नेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी आता चाकण एमआयडीसी पोलिस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस नराधम आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि. 13 मे) ला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण भागातील मेदनकरवाडी या ठिकाणी घडली.

पीडित महिला रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती. या वेळी आरोपीने तिचा पाठलाग करून या मार्गावरील एका मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत नेत निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहेे.
बलात्कार करून, मारहाण अन् धमकी
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत एका आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आतामध्ये जेरबंद केले. 27 वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती.
एका कंपनीत ही पीडित महिला हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर जोरदार मारहाण करून जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी देखील दिली.
पीडितेने आरोपीला चावा देखील घेतला
बळजबरी ओढून नेत असताना सदर महिलेने आरोपीस जोरदार प्रतीकार केला. त्याला चावा देखील केली. घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पलायन केले. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं.
महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आणि पकडण्यात चाकण पोलिसांना यश आलं. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications