मोठा खुलासा! भारतीय शस्त्रं कुठं तैनात होती; चीननं पाकिस्तानला सांगितलं! कशी केली पाकड्याची मदत वाचा
India Pakistan War : पहलगाममध्ये भारतीयांवर हल्ला करुन 26 जणांचे दहशतवाद्यांनी बळी घेतले. यानंतर भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या संघर्षात पाकिस्तानी लष्कराने भारताशी संघर्ष सुरु करत हवाई हल्ले केले. या माऱ्याला समर्थपण तोंड देत भारतीय वायूसेनेने कराचीपर्यंत धडक देत पाक लष्कराचे मुख्य ठिकाणे उडवले. पाकिस्तान शरण आल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष विराम सध्या आहे.
यापार्श्वभुमीवर आता एक खुलासा समोर आला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाशी संबंधित एका संशोधनातून असे समोर आले आहे की भारतासोबतच्या अलीकडील युद्धात चीनने हवाई संरक्षण आणि उपग्रहाद्वारे पाकिस्तानला मदत केली होती. यावरून असे दिसून येते की चीन केवळ या बाबींमध्येच नाही तर त्यापलीकडेही पाकिस्तानला मदत करू शकतो.

कुणी उघड केली ही माहिती?
पाकिस्तानला चीन मदत करत असल्याचे 'सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज' या स्वतंत्र थिंक टँकने हे उघड केले आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात चीनची भूमिका: सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीजचे संचालक अशोक कुमार यांनी याबाबत स्पष्टता दिली. ते म्हणाले की, 22 एप्रिल ते युद्ध सुरू होण्याच्या दरम्यान चीनने उपग्रहाद्वारे पाकिस्तानला खूप मदत केली होती. कुमार यांच्या मते, "यामुळे त्यांना हवाई कारवाईबद्दल आगाऊ माहिती देण्यासाठी त्यांचे हवाई संरक्षण रडार पुन्हा तैनात करणे शक्य झाले".
शस्त्रास्त्र साठा, गुप्तचर माहिती पुरवली?
पाकिस्तानने चिनी शस्त्रे वापरली, त्यांनी ही कबुली दिली आहे पण हे जरी उघड दिसत असले तरीही भारत सरकारने चीनच्या सहभागाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. जर थिंक टँकच्या अहवालानुसार, चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा साठा आणि गुप्तचर माहिती दोन्ही पुरवली हे दिसते. खास बाब म्हणजे आजपर्यंत चीन किंवा भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने या दाव्यांबद्दल माध्यमांच्या चौकशीला प्रतिसाद दिलेला नाही.
काय म्हणाले अशोक कुमार?
वनइंडिया हिंदीने अशोक कुमार यांच्या माहितीचा हवाल्यानुसार, वृत्त दिले आहे. त्यानुसार, कुमार म्हणाले की, या युद्धात चीनने आपल्या लष्करी हार्डवेअरची देखील चाचणी केली आहे. त्यांनी सांगितले की काही चिनी संरक्षण उपकरणे कमकुवत होती आणि ती पूर्णपणे निकामी झाली. उदाहरणार्थ, या घटनेपूर्वी जे-आयओसी लढाऊ विमान आणि पीएल-15 हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यासारख्या चिनी लष्करी उपकरणांची थेट लढाईत चाचणी घेण्यात आली नव्हती.
चीन काय म्हणतोय..?
हा दावा असो की, अजून काही वृत्त चीनने भारत-पाक संघर्षात त्यांची मदत होती, याबद्दल जाहीर काहीही सांगितलेले नाही आणि पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याच्या दाव्याला समर्थन देणारे पुरावेही दिलेले नाहीत.












Click it and Unblock the Notifications