मराठी जनांनो अभिनंदन! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारने आता 'जीआर'च काढला!
Marathi gets classical language status : महाराष्ट्रातील मराठी माणासांसाठी आनंदाची बातमी आहे आणि अभिनंदन करावे तेवढे कमी आहे कारण याआधी केंद्र सरकारकडून मराठी भाषेला 4 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजूरीही दिली होती. त्यानंतर आज 8 जानेवारी 2025 यासंदर्भातील शासन निर्णयही केंद्र सरकारने काढला आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नंतर माय मराठीच्या अभिजात दर्जासंबंधी जीआर काढण्यात आला, त्यामुळे आता मराठी भाषेचा विकास, उत्थान आणि भविष्य मजबूत बनले आहे.

'या' भाषांनाही अभिजात दर्जा
केंद्र सरकारने मराठी भाषेसोबतच पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
हेही वाचा : केंद्र सरकारचेही 'महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम' हे ब्रिद, महत्वाच्या योजना मान्य, गुंतवणूकीतही वाढ
मराठी जनांसाठी आनंदाचा दिवस
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी माणसाची अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. दरम्यान याआधी केंद्र सरकारने संस्कृत, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्यालम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आला होता. आता यात मराठी भाषेचाही समावेश झाला आहे.त्यामुळे मराठी माणसांसाठी हा आनंदाचा दिवस असणार आहे.
हेही वाचा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान- खा. संजय राऊत
माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित मंत्रालयाचे महाराष्ट्रातील सरकारने यापुर्वीच आभार व्यक्त केले आहे.
हेही वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मोदी सरकारचा मोठा निर्णय












Click it and Unblock the Notifications