मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मोदी सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रतील मराठी माणासांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजूरी दिली आहे. मराठी भाषेसोबतच पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी माणसाची अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. दरम्यान याआधी केंद्र सरकारने संस्कृत, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्यालम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आला होता. आता यात मराठी भाषेचाही समावेश झाला आहे.त्यामुळे मराठी माणसांसाठी हा आनंदाचा दिवस असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे मानले आभार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. "माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार", असं ट्टिट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझा मराठाचि बोलु कौतुके।
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 3, 2024
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!
अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान…
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्टिट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी आपल्या ट्टिट म्हटलं आहे की, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.
हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.असं ट्टिट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.…
समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एक ट्टिट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत, असं ट्टिट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 3, 2024
आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या…












Click it and Unblock the Notifications