Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिमानास्पद ! जगभरात सर्वाधिक बोलणाऱ्या भाषांमध्ये मराठीही अग्रस्थानी, नंबर पाहून व्हाल थक्क!

Marathi Bhasha Gaurav Din 2025 : आज 27 फेब्रुवारी 2025 अर्थात मराठी भाषा गौरव दिन आहे. जगभरातील मराठी बांधवांकडून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहामध्ये व आनंदाने साजरा केला जात आहे. मराठी भाषा ही आपल्या भावनांची भाषा आहे. ही अभिमानाची भाषा आहे. तुम्हाला सर्वांना देखील मराठी भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!

मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण आज जाणून घेणार आहोत की, जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा कितव्या क्रमांकावर आहे. चला तर मग पाहुयात जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आहेत व मराठी स्थान नेमके कितव्या स्थानावर आहे.

Marathi Bhasha Gaurav Din 2025

अमेरिकेतील एथनोलॉग या एसआयएल इंटरनॅशनल मार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अहवालामध्ये जगभरात सर्वाधिक लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांची यादी 2019 साली तयार करण्यात आली होती. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजेच प्राथमिक भाषा असं या अहवालात म्हटलेले आहे. यात प्रामुख्याने पहिल्या वीस भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. यात सर्वाधिक बोलली जाणारी भाषांना क्रमवारी देण्यात आलेली आहे. तर मराठीचा क्रमांक देखील अभिमानास्पद आहे.

हे ही वाचा : ज्यांच्या सन्मानार्थ मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो, ते 'कुसुमाग्रज' नेमके कोण आहेत, वाचा सविस्तर

सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?

सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये उर्दू 20 व्या स्थानी आहे. जगभरात ६ कोटी ८६ लाख लोकं उर्दू भाषा बोलतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या 0.819 टक्के लोक उर्दू भाषा बोलतात.

हे ही वाचा : Marathi Bhasha Gaurav Din wishes : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास शुभेच्छा!

मराठी भाषा कितव्या स्थानावर पोहोचली?

एथनोलॉग संस्थेच्या वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार, मराठी ही जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये 10 व्या स्थानी आहे. प्रामुख्याने भारतामधील महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते. जागतिक लोकसंख्येच्या 1.079 टक्के लोक मराठी बोलतात. म्हणजेच जगातील 8 कोटी 31 लाख लोकं मराठी भाषा बोलतात. त्याच्या खालोखाल पश्चिम पंजाबी (Western Punjabi) ही जगातील 1.024 टक्के म्हणजेच 9 कोटी 27 लाख लोकं ही भाषा बोलतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत ही भाषा 9 व्या स्थानी आहे.

यू चायनीज कितव्या स्थानावर बोलली जाते?

यू चायनीज ही सर्वाधिक बोलली जाणारी 19 वी भाषा आहे. जगभरामध्ये ७ कोटी ३१ लाख लोकं ही भाषा बोलतात. मुख्यपणे हाँगकाँग आणि मकाऊमध्ये ही भाषा बोलली जाते. जागतिक लोकसंख्येच्या 0.949 टक्के लोकं ही भाषा बोलतात.

हे ही वाचा : 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यामध्ये काय फरक आहे, कधी व कसे साजरे होतात हे दिवस?

तामिळ (Tamil) कितव्या स्थानावर?

तामिळ ही जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत 18 व्या स्थानी आहे. प्रामुख्याने श्रीलंका आणि भारतात बोलली जाणारी ही भाषा 7 कोटी 50 लाख लोक बोलतात. एकूण जागतिक लोकसंख्येच्या 0.974 टक्के लोकं तामिळ भाषा बोलतात. दुसरी बाब म्हणजे जगभरात मराठी भाषेनंतर तामिळ व तेलगू भाषा देखील जगभरात बोलली जाते. तेलगू ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये 11 व्या स्थानी आहे. जगातील १.०६५ टक्के म्हणजेच ८ कोटी २० लाख लोकं ही भाषा बोलतात.

व्हिएनामीज भाषा कितव्या स्थानावर आहे?

"व्हिएतनाम आणि चेक प्रजासत्ताकमध्ये ही भाषा बोलली जाते. ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये १७ व्या स्थानी आहे. ७ कोटी ६० लाख लोकं ही भाषा बोलतात. जगातील ०.९८७ टक्के लोकं ही भाषा बोलतात. त्या खालोखाल जर्मन देशातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीची ही अधिकृत भाषा आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत जर्मन भाषा 16 व्या स्थानी आहे. 7 कोटी 69 लाख लोकं ही भाषा बोलतात. जर्मन बोलणाऱ्यांची संख्या जागतिक लोकसंख्येच्या 0.988 टक्के इतकी आहे. त्या खालोलाल फ्रेंच, कोरियन या भाषांचा समावेश होतो.

हिंदी भाषा जगभरात कितव्या स्थानावर बोलली जाते?

भारतात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी ही जागतील स्तरावरील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. जगातील ३४ कोटी १० लाख लोकं हिंदी भाषा बोलतात. जागतिक लोकसंख्येच्या ४.४२९ लोकं ही भाषा बोलतात.

इंग्रजी भाषा ही जगभरात तिसऱ्या स्थानावर पोहोचली?

इंग्रजी ही भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जात असली तरी जागतिक स्तरावरील ती तिसऱ्या स्थानी आहे. जगातील ४.९२२ टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात. म्हणजेच इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या ३७ कोटी ९० लाख इतकी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+